दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, डेल्टा प्लसचा धोका, निर्बंधात बदल, अकोल्यात काय सुरु काय बंद?
डेल्टा प्लस विषाणूचा धोका बघता अकोला जिल्ह्यातही निर्बंधांमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे (Akola district collector declare new restriction for district on corona third wave).
अकोला : राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडा हा कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचे ढग दिवसेंदिवसे दाट होताना दिसत आहेत. कोरोनाची आणखी एक लाट येणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. या तिसऱ्या लाटेत कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू हा जास्त घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या नव्या विषाणूचा शिरकाव महाष्ट्रात झाला आहे. जवळपास 21 रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचा धोका बघता अकोला जिल्ह्यातही निर्बंधांमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे (Akola district collector declare new restriction for district on corona third wave).
दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी
संपूर्ण अकोला जिल्ह्यातील मनपा, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कलम 144 अंतर्गत सकाळी 5 ते संध्याकाळी 6 या कालावधीत जमावबंदी लागू राहील. तसेच संध्याकाळी 5 ते सकाळी 6 या कालावधीत संचारबंदी लागू राहील. सदर कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस मुक्तसंचार करण्यास मनाई आहे (Akola district collector declare new restriction for district on corona third wave).
अकोला जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?
1) अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने/आस्थापना दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने, चालणे, दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
2) 50 टक्के क्षमतेने या बाबी सुरू राहतील :
3) रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 50 टक्के क्षमतेनूसार Dining साठी सुरु राहतील. तथापी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा/ घरपोच सुविधा देता येईल. तसेच शनिवार आणि रविवार Dining पूर्णपणे बंद राहील. केवळ पार्सल सुविधा/ घरपोच सुविधा देता येईल.
4) शासकीय कार्यालय उपस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम, सभा, निवडणुक, स्थानिक प्राधिकरण आणि सहकारी संस्था यांची आमसभा (सभागृहाच्या 50 टक्के आसन क्षमतेने) सुरु राहतील.
5) व्यायामशाळा / सलून / केस कर्तनालय / ब्यूटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर (अपॉइंटमेंट घेणे आवश्यक).
6) उत्पादन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा आणि निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रदान उद्योग, इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा वगळता इतर उद्योग 50 टक्के क्षमतेने सुरू राहील.
7) लग्न समारंभाकरीता केवळ 50 जणांची उपस्थिती तर अंत्यविधी 20 व्यक्तिंच्या मर्यादेत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
8) मॉल्स / सिनेमागृहे ( मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रिन) नाट्यगृहे पूर्णत: बंद राहील.
अकोल्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात
अकोल्यातील कोरोना परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. अकोल्याती रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच मृत्यदरही कमी झाला आहे. अकोला जिल्ह्यात सध्या 426 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 3 टक्क्यांवर आला आहे.ट
हेही वाचा :
दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, सिनेमागृहे बंदच, जाणून घ्या जळगाव जिल्ह्यात नवे नियम काय ?