महिलेचं बाळ CCU मध्ये भरती, ती चार दिवसांपासून बेपत्ता; अखेर धक्कादायक सत्य समोर

अकोल्यात एक धक्कादायक बातमी समोर आली. एका महिलेचं बाळ सीसीयूमध्ये भरती होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली.

महिलेचं बाळ CCU मध्ये भरती, ती चार दिवसांपासून बेपत्ता; अखेर धक्कादायक सत्य समोर
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 2:07 PM

अकोला : अकोल्यात एक धक्कादायक बातमी समोर आली. एका महिलेचं बाळ सीसीयूमध्ये भरती होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली. बाळाला सोडून कुठं गेली. याचा शोध सुरू होता. पण, ती कुठचं सापडली नाही. दोन-तीन नव्हे तिला बेपत्ता होऊन चार दिवस झाले. घरचे सगळे परेशान झाले. ती कुठं गेली असेल याचा शोध त्यांनी घेतला. पण, ती काही सापडली नाही. शेवटी रुग्णालयातील एक शौचालयाचे दार बंद होते. तिथून कुणालातरी दुर्गंध आला. त्यामुळे त्यांनी रुग्णालय प्रशासनाला कळवलं. रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी दार तोडला. तेव्हा सारेचं हादरले.

बाळ चार दिवसांपासून सीसीयूमध्ये

अकोला शहरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिलेची शौचालयात फाशी घेऊन आत्महत्या केली. गेल्या चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. चार दिवसांपासून महिलेच बाळ हे CCU मध्ये भरती आहे. पण महिला या बाळाला कुठे सोडून गेली याचा तपास सुरु असताना हे धक्कादायक वास्तव पुढं आलं.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी तोडले शौचालयाचे दार

आज सकाळी शौचालयातून दुर्गंधी येत होती. दरवाजा आतून बंद असल्याने संशय आला. सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शौचालयाचे दार तोडले. शौचालयात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सारेचं हादरले.

स्वतःला संपवण्यामागचे कारण काय?

मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पण या महिलेने का आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहे. या महिलेला मुलगी झाली असल्याने या महिलेने आत्महत्या केली असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरु होती. पोलीस तपासानंतरच ही बाब स्पष्ट होईल. मात्र, छोट्याशा बाळाला ठेवून तीनं जीवन संपवलं. त्यामुळं ते बाळ आता आईविना पोरकं झालं आहे.

त्या बाळाची काळजी कोण घेणार

आईच्या मृत्युनंतर ते बाळ एकाकी झालं आहे. त्याला आईची माया कोण देणार. शेवटी असा घातक निर्णय या महिलेला का घ्यावा लागला, असे सारे प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....