जिल्हाधिकारी होण्याचं प्रांजलचं स्वप्न अधुरं, एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादेत उपचार, तरीही कोरोनाने हरवलं!

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पातूर तालुक्यातील एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. Akola Pranjal Nakat

जिल्हाधिकारी होण्याचं प्रांजलचं स्वप्न अधुरं, एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादेत उपचार, तरीही कोरोनाने हरवलं!
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 3:45 PM

अकोला: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पातूर तालुक्यातील एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रांजल नाकट असं त्याचं नाव आहे. प्रांजल नाकट याच्यावर कोरोना विषाणूमुळं प्रकृती खालावल्यानं हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. (Akola Pranjal Nakat died due to corona who cleared UPSC civil services pre Exam)

55 लाखांचा खर्च व्यर्थ

प्रांजल नाकट याला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अकोल्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. कोरोना विषाणू संसर्गामुळं फुप्फुसाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यानं  त्याला हैदराबादला उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. प्राजंल नाकट याच्या कुटुंबीयांनी प्रांजल बरा व्हावी म्हणून तब्बल 55 लाख रुपये खर्च केले. मात्र, प्रांजलचं निधन झाल्यानं हा खर्च व्यर्थ ठरला.

प्रांजल युपीएससी परीक्षा उत्तीर्ण

प्रांजल नाकट यानं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी त्यानं कठोर परिश्रम घेतले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली नागरी सेवा परीक्षा 2020 ची पूर्व परीक्षा देखील त्यानं उत्तीर्ण केली होती. प्रांजल नाकटला गेल्या आठवड्यात कोरोना संसर्ग झाला होता. हैदराबादला उपचार करण्यासाठी त्याला एअर अ‌ॅम्ब्युलन्सद्वारे हैदराबादला नेण्यात आलं होतं.

राज्यात 5,19,254 सक्रिय रुग्ण

राज्यात शुक्रवारी 39,923 नव्या रुग्णाांची नोंद झालीय. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 53,09,215 झालीय. तर, राज्यात आज एकूण 5,19,254 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, राज्यात एकूण 47,07,980 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.68% एवढे झाले आहे.

राज्यात 34,82,425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये

शुक्रवार 14 मेपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,06,02,140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,09,215 (17.35 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या:

UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी होणार?

UPSC CSE Exam 2021: नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची यूपीएससीकडे मागणी, ट्विटरवर मोहीम सुरु

(Akola Pranjal Nakat died due to corona who cleared UPSC civil services pre Exam)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.