अकोला शिवसेनेत मदभेद? जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपाशी संधान साधत असल्याचा पत्रात गंभीर आरोप केलाय. तसेच नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात यावी. पक्षांतर्गत नव्याने निवडणुका करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अकोला शिवसेनेत मदभेद? जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
अकोला शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 12:46 PM

अकोला : विधान परिषद निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा पराभव झाला. त्यानंतर अकोला शिवसेनेतील मतभेद नव्याने उफाळून आलेत. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) यांनी पक्षप्रमुखांना लिहिले. त्या पत्रात आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पिंजरकरांसह असंतुष्ट सेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. हे पत्र दोन दिवसांपूर्वी मुंबईत सचिव खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांच्याकडे सोपवण्यात आलेत. अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा हे जिल्हाप्रमुखांसोबत आहेत. मिश्रासुद्धा पक्षाच्या दयनिय अवस्थेला कारणीभूत असल्याचं पत्रात म्हटलंय.

आमदार नितीन देशमुखांवर केलेले आरोप काय

आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर आहेत. जिल्ह्यात खंडणी वसुलीत आमदार देशमुख सर्वात समोर असल्याचा पिंजरकरांनी पत्रात आरोप केलाय. जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले आहेत. जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपाशी संधान साधत असल्याचा पत्रात गंभीर आरोप केलाय. तसेच नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात यावी. पक्षांतर्गत नव्याने निवडणुका करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रात लिहिलं काय?

श्रीरंग पिंजरकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावानं पत्र लिहिलंय. त्यात ते लिहितात, शिवसेना कार्यकारिणीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेना उभारताना काही खटले आमच्यावर दाखल आहेत. पण, नितीन देशमुख हे चार पक्ष बदलून आले आहेत. देशमुख आधी वंचित बहुजन आघाडीत नंतर जनसुराज्य पार्टीत होते. भाजपच्या पाठिंब्यावर बाळापूर मतदारसंघात पराभूत झाले. नंतर काँग्रेस, अपक्ष असा सारा प्रवास करून शिवसेनेत आलेत. बाजोरीया निवडणुकीत उभे असताना त्यांच्या विरोधात काम केले. असे असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचं त्यांचं काम सुरू आहे. पक्षाच्या वाढीसाठी महत्त्वाचे निर्णय घेताना आम्हाला विचारले जात नाही, अशी खंत पिंजरकर यांनी पत्रातून मांडली आहे.

Photo – नागपूरकरांच्या सेवेत स्कायलिफ्ट दाखल, उंचीवर अडकलेल्यांनाही काढता येणार बाहेर

नागपुरात भाजप नेते अविनाश ठाकरेंची सायकलवारी, व्यायाम आणि मतदारसंघातील जनसंपर्काचा मेळ

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.