अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळी, पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज नाही, कुठे होणार पोटनिवडणूक?

अकोला जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज सादर झाला नाही. | Akola Zilha parishad And Panchayat Samiti Election

अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळी, पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज नाही, कुठे होणार पोटनिवडणूक?
अकोला जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 7:01 AM

अकोला : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज सादर झाला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकीसाठी 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. (Akola Zilla Parishad Panchayat Samiti battle no candidate application on the first day, where will the by-election be held)

ओबीसी आरक्षण, न्यायालयाचा निर्णय आणि निवडणूक…

3 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट झाला होता. आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला. डिसेंबर 2018 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात असल्याने शासनाने पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून 2020 मध्ये निवडणुका झाल्या. मात्र 4 मार्च रोजी न्यायालयाने अंतिम निर्णय देत ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या होत्या.

5 जुलैपर्यंत भरता येणार अर्ज

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकीसाठी 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. अन्यबाबी पुढील प्रमाणे होणार आहेत.

पुढील तारखा महत्त्वाच्या…

1) जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी व त्यावर निर्णय देण्यात येईल आणि वैध उमेदवारांची यादीही प्रकाशित हाेईल….

2)09 जुलै रोजी जिल्हा न्यायाधिशांकडे अपील करता येईल….

3)12 जुलै रोजी न्यायाधिश निकाल देणार आणि उमेदवारी अर्ज मागे घेता येईल व चिन्हाचे वितरण हाेईल….

4) 14 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दुपारी 3 पर्यंत मागे घेता येईल….

5) 19 जुलै रोजी मतदान होणार….

6) 20 जुलै रोजी मतमोजणी होईल….

7) 23 जुलै रोजी विजयी सदस्यांची नावे जाहीर होणार….

कुठे होणार पोटनिवडणूक

1) अकोला जिल्हा परिषद : दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा, शिर्ला सर्कलमध्ये निवडणूक होणार आहे.

2) अकोला पंचायत समिती : हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपूरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग 1, देगाव, वाडेगाव भाग 2, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानपूर, आलेगावसाठी निवडणूक होणार आहे.

(Akola Zilla Parishad Panchayat Samiti battle no candidate application on the first day, where will the by-election be held)

हे ही वाचा :

फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, भास्कर जाधवांचा जोरदार टोला

ठाकरे पवारांची 22 दिवसात दुसरी भेट, राऊतांचे ‘नरेंद्रभाई’, मविआत कशाची घाई? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.