अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; भाजपची महाविकास आघाडीला मदत, दाेन्ही सभापतीपदांची माळ गळ्यात!

अकाेला जिल्हा परिषदेतील दाेन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत महााविकास आघाडीने बाजी मारली. महाविकासच्या दाेन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केल्याने विजय सुकर झाला.

अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; भाजपची महाविकास आघाडीला मदत, दाेन्ही सभापतीपदांची माळ गळ्यात!
स्फूर्ती गावंडे आणि सहकारी विजयाची व्हिक्ट्री दाखवताना...!
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 7:12 AM

अकोला : अकाेला जिल्हा परिषदेतील दाेन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत महााविकास आघाडीने बाजी मारली. महाविकासच्या दाेन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केल्याने विजय सुकर झाला. वंचितला 24 तर महाविकास आघाडीला 29 मते मिळाली. तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्फूर्ती गावंडे तर विषय समिती सभापतीपदी अपक्ष सदस्य सम्राट डाेंगरदिवे विजयी झाले असून सर्वाधिक सदस्य संख्या असूनही पराभव झाल्याने हा निकाल सत्ताधारी वंचितसाठी धक्का मानला जात आहे.

जानेवारी 2020 मध्ये जि.प, पं.स. निवडणुका झाल्या होत्या मात्र ओबीसीच्या आरक्षणावरून सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हाेती. न्यायालयाने 4 मार्च राेजी ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त हाेणार नाही,असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या हाेत्या. त्यामुळे 5 ऑक्टाेबर राेजी मतदान झाले आणि 6 ऑक्टाेबर राेजी निकालही जाहीर झाला हाेता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतींच्या दाेन जागांसाठी शुक्रवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

असे जुळले समीकरण

पाेट निवडणुकीनंतर वंचितचे संख्याबळ 23 झाले आहे. शिवसेना-13 (एक सदस्या काही दिवसांपूर्वी अपात्र झाली असून, सध्या प्रकरण अंधातरित आहे)  भाजप-5, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 4, प्रहार जनशक्ती पक्ष 1 व तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यापैकी एका अपक्ष सम्राट डाेंगरदिवे यांनी महााविकास आघाडीकडून सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आणि भाजपने प्रहारला पाठिंबा दिल्याने महिला व बालकल्याण सभापती पद स्फूर्ती गावंडे यांच्याकडे आले असून विषय समिती सभापतीसाठी सम्राट डाेंगरदिवे अविराेध निवडून आले.

वंचित बहुजन आघाडीच्या याेगिता राेकडे व संगिता अढाऊ या दाेघींनीही महिला व बाल विकास समिती सभापतीसाठी अर्ज भरला. परिणामी विषय समिती सभापतीसाठी डाेंगरदिवे एकटेच रिंगणात राहिले. नंतर अढाऊ यांनी अर्ज मागे घेतला आणि राेकडे व प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांच्यात लढत झाली असून यापुढे जिल्हापरिषद अध्यक्ष हा महाविकास आघाडीचा राहील, असं शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं.

हे ही वाचा :

‘पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो’; मलिकांचा फडणवीसांवर पलटवार

”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”, नारायण राणेंचा प्रहार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.