Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur | जलयुक्त शिवाय योजनेत गैरव्यवहार, तपास अहवालात फेरफार केल्याचा आरोप, प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे

चंद्रपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या (Jalayukta Shivar Yojana) कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत ही बाब उघड झाली. 125 कोटी रुपयांच्या एकूण कामांमधील 50 टक्केही काम झाले नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.

Chandrapur | जलयुक्त शिवाय योजनेत गैरव्यवहार, तपास अहवालात फेरफार केल्याचा आरोप, प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे
जलसंधारण Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 3:31 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील 373 गावांमध्ये फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना (Jalayukta Shivar Yojana) राबविण्यात आली. कृषी विभाग, वनविभाग, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग (Minor Irrigation Department), राज्य शासनाचा लघु पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग (Water Resources Department ), पंचायत समिती अशा एकूण 6 विभागांनी या योजनेंतर्गत काम केले आहे. त्यांच्या कामात सिमेंट नाला बांध, नाला वनविभागाच्या पाण्याच्या टाक्यांचे खोलीकरण, पाण्याच्या टाक्यांची सुधारणा, धरण सुधारणा कामांचा समावेश करण्यात आला होता. जिल्ह्यात 10,391 कामे प्रस्तावित होती. तत्कालीन फडणवीस सरकारने 125 कोटी 34 लाख 81 हजार रुपयांचा निधी या कामासाठी प्रस्तावित केला होता. मात्र 2014 ते 2019 या कालावधीत यातील निम्मी कामे देखील झालेली नाहीत. याशिवाय जी झाली ती वर्षभरात निकृष्ट दर्जा असल्याने भुईसपाट झाली.

चौकशी करण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीत याबाबत सत्यस्थिती उघड झाली आहे. या कामात दोष दाखविणारा थर्ड पार्टी ऑडिट संस्थेने दिलेला तपास अहवाल देखील फेरफार केल्याचा आरोप केला जात आहे. शेतकऱ्यांसाठी राबविली गेलेली ही योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे रेटण्यात आली आहे. विचोडाचे (बु) माजी सरपंच मनोहर जाधव व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी ही मागणी रेटली आहे.

प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे

हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे गेले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. फक्त चौकशी करून होणार नाही, तर दोषींवर कारवाई झालेली तुम्हाला दिसेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलंय.

Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.