Gadchiroli Naxalite : गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मदत करण्याचा आरोप, सरकारी MBBS डॉक्टरसह 3 नक्षलसमर्थकांना अटक

| Updated on: Jul 29, 2022 | 2:40 PM

या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस अलर्ट राहून प्रत्येक भागात ऑपरेशन राबवत होते.

Gadchiroli Naxalite : गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मदत करण्याचा आरोप, सरकारी MBBS डॉक्टरसह 3 नक्षलसमर्थकांना अटक
गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मदत करण्याचा आरोप
Follow us on

गडचिरोली : नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात सरकारी एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली. पोलिसाची गस्त सुरू असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे (Martyrs Week) बॅनर लावताना हे तिघे सापडले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केद्राच्या (Kamalapur Primary Health Centre) एमबीबीएस डॉक्टर पवन उईकेचा (Dr. Pawan Uike) समावेश आहे. डॉक्टरसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे (UAPA) या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलीस पथकाची कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना बांधत असल्याची माहिती पोलीस विभागाच्या हाती लागली. गुप्त पद्धतीने पोलीस विभागाचे काही कर्मचारी जंगलात लपून याची माहिती घेत होते. कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेला एक एमबीबीएस डॉक्टरसह तीन आरोपींना अटक करण्यात आली. एकूण चार आरोपींना नाचले होते. पोलीस पथक गडचिरोली यांनी ही अटक केली.

सरपंचाची नक्षल्यांनी केली होती हत्या

गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवादाची दहशत निर्माण करण्यासाठी हे बॅनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात किंवा रस्त्याच्या अलीकडे-पलीकडे लावत असतात. या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस अलर्ट राहून प्रत्येक भागात ऑपरेशन राबवत होते. ऑपरेशन राबवित असताना बॅनर लावण्यात सहभागी होते. यावेळी त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरवर दबावाची शक्यता

अहेरी तालुक्यातील कमलापूर हा भाग नक्षलवाद्यांचा माहेरघर म्हणून ओळखला जातो. या घटनेमुळं चांगलीच खळबळ उडाली. डॉक्टर स्वखुशीने हे सारे करत होता की, त्याच्यावर दबाव होता, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. नक्षली दरवर्षी नक्षल सप्ताह साजरा करतात. अशावेळी नक्षली कारवायांना गती येते. अशातच बॅनर लावताना हे तिघे सापडले आहेत. पोलिसांना आता याची पाळेमुळे खोदून काढावी लागतील. कारण नक्षली सप्ताहावेळी नक्षलवादी हे अधिक सक्रिय होतात.