बुलडाणा : अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये या गरजांमध्ये अजून एका बाबीचा समावेश झालाय. तो म्हणजे मोबाईल. मोबाईलदेखील आता जीवनावश्यक (Vital) वस्तू बनलेला आहे. मोठ्यांप्रमाणे अगदी लहान मुलांनाही मोबाईल पाहण्याचे एक प्रकारे व्यसन लागलंय. आता यात भर पडली ती म्हणजे मांजरेच्या पिल्लांची. एक नव्हे तर हे दोन पिल्लू मोबाईल पाहतात. मोबाईलवर कार्टून पाहणं त्यांना आवडतं. नाना हिवराळे (Nana Hiwarale) हे या मांजरांच लाड पुरवितात. त्यामुळं या मांजरीही त्यांना तसा प्रतिसाद देतात. मोबाईल वडीलही पाहू देत नाही मुलांना फार वेळ. पण, नाना या मांजरांना मोबाईल (Mobile) पाहू देतात. त्यामुळं त्यांची गट्टी जमली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नाना हिवराळे यांच्याकडे दोन मांजरीचे पिल्ले आहेत. टायगर आणि छोटी अशी या पिल्लांची नाव आहेत. या दोन्हीही पिल्लांना मोबाईलवर कार्टून पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. झोपही येत नाही. हे दोन्ही पिल्ले अगदी एकाग्रचित्त करून मोबाईलमध्ये कार्टून पाहताना दिसतात. बरं एवढंच नाही, तर त्यांना माणसाची सर्व भाषा देखील समजत असल्याचं नाना हिवराळे सांगतात. हे पिल्लं त्यांच्याबरोबर कविताही त्यांच्या भाषेत म्हणताना दिसतात.
नाना हिवराळे कविता म्हणतात, तशीच कविता या मांजरीही त्यांच्या भाषेत म्हणतात. ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवला जसा. लहान लहान डोळे छान. लहान शेपूट मोठे कान, अशी कविता मांजर आपल्या भाषेत म्हणतात. विशेष म्हणजे या मांजर कार्टून पाहतात. खामगाव येथील टायगर आणि छोटीला कार्टून पाहण्याचा छंद. नाना हिवराळे हे या मांजरांचे लाड पुरवितात. त्यामुळं मांजर मालकाकडून एकदम खुश आहे.