पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात, नवनीत राणांचं टीकास्त्र

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात, नवनीत राणांचं टीकास्त्र
नवनीत राणा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 6:00 PM

अमरावती: खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नवनीत राणाचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभेचं कामकाज आटोपून नवनीत राणा थेट बांधावर

मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात सुरु आहे,त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालंय. सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहताहेत. तर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्यात. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली आहे.

नवनीत राणा यांना अश्रू अनावर

नवनीत राणा यांनी भर चिखलातून, पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले.

मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावं

नवनीत राणा यांनी विदर्भातल्या नुकसानाच्या मुद्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पाहावी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जो पर्यंत मुख्यमंत्री अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला नुकसान झालंय हे कस कळणार, मदत कशी दिली जाणार असा प्रश्न थेट खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

दादा भुसे यांच्याकडून नुकसानाची पाहणी

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. नदी -नाल्यांना पूर आल्याने शेती खरडून गेलीय. अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून अमरावती जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी त्यांनी केलीय. तातडीने सर्वांचे सर्वेक्षण करा असे निर्देश प्रशासनाला दिलेत, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधत शेतकऱ्यांची विचारपूस केली.सरकार तुमच्या पाठीशी आहे, नुकसान झालेल्याना भरपाई मिळणार असं आश्वासन अमरावतीच्या शेतकऱ्यांना यावेळी कृषी मंत्र्यांनी दिलंय.

इतर बातम्या:

Sarkari Naukri 2021: लोकसभा सचिवालयात विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

VIDEO: राज्याला मुख्यमंत्रीही नाही, प्रशासनही नाही, राज्य आम्हाला द्या, आम्ही वेटिंगवरच आहोत: नारायण राणे

Amaravati MP Navneet Rana slam cm Uddhav Thackeray and advised to visit Amravati and Vidarbha

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.