परभणी : राज्यात बुधवारी पावसाने ठिकठिकाणी जोरदार बॅटिंग केली. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. येथे परभणी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. त्यानंतर अनेक तालुक्यांत हलका, मध्यम तसेच मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. (amid Monsoon heavy to moderate rain recorded in different talukas of Parbhani district)
आज सकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आज दिवसभरात परभणी, गंगाखेड, सेलू, पाथरी, पूर्णा तसेच जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. काही ठिकाणी अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. मान्सूनच्या या जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
औरंगाबाद जिल्ह्यात आज ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड तालुक्यात अर्धा तास धुवांधार पाऊस झाला. या तिन्ही तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. तसेच पाऊस चांगला झाल्यामुळे आगामी काळातही मराठवाडा तसेच औरंगाबादेत वरुण राजाची कृपा राहावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
राज्यात पुढील चार दिवस कोकण तसेच गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याने कोकण आणि महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. याच कारणामुळे मुंबई, कोकण तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे हवामान वेधशाळेने हा अंदाज वर्तविला आहे.
Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, दादर, लोअर परळ भागात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी
औरंगाबाद जिल्ह्यात तुफान पाऊस, जुई नदीला पूर, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प
(amid Monsoon heavy to moderate rain recorded in different talukas of Parbhani district)