…आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; नितीन देशमुख अटक प्रकरणी अमोल मिटकरी यांचा घणाघात

आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार हे अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली. सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे.

...आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; नितीन देशमुख अटक प्रकरणी अमोल मिटकरी यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 4:58 PM

अकोला : खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन अकोल्यावरुन नागपूरला निघालेली आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवरंच थांबवण्यात आली. नागपूर पोलीस आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना डिटेन करुन अकोल्याच्या दिशेनं घेऊन निघालेत. आम्हाला नागपूर पोलिसांनी डिटेन केलंय. आत्ताच कळलं की ते अकोला येथे घेऊन जात आहे. पण आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. सरकारने जर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही. तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा  नितीन देशमुख यांनी दिला.

सैतानी साम्राज्याचा उदय

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूरजवळ अटक करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार हे अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली. सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जितजागत उदाहरण आज अकोला ते नागपूरपर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख.

देशमुख यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली. त्यावरून पाहायला मिळाला आहे. त्यामुळेही सैतानी साम्राज्याची उदय आहे. असा टोला आज अमोल मिटकरी यांनी नितीन देशमुख यांच्या अटकेवर सरकारला लागला आहे.

तेव्हापासून लोकशाही संपली

अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रातील लोकशाही संपली आहे. सैतानी साम्राज्याचा उदय झाला. नितीन देशमुख यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली.

गृहमंत्री दडपण टाकतात. पोलीस देशमुख यांना माघारी पाठवतात. देशमुख यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे प्रकार सुरू होतात. बेकायदेशीररीत्या देशमुख यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी वागणूक दिली जाते, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.

याची परतफेड महाविकास आघाडी करणार

शिवसैनिकांना अमानुषपणे वागवलं जातं. अशा घटना सैतानी साम्राज्याचा उदय आहे. महाराष्ट्रात लोकशाही शिल्लक असेल असं मला वाटत नाही. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात. उद्या महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर याची परतफेड केल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.