VIDEO: अनिल देशमुखांना फरार घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी

संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. (anil deshmukh should Declare absconding, kirit somaiya demands)

VIDEO: अनिल देशमुखांना फरार घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी
kirit somaiya
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 4:16 PM

रत्नागिरी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात यावं आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. (anil deshmukh should Declare absconding, kirit somaiya demands)

संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची मागणी केली. अनिल देशमुख प्रकरणात आणखी एक कलाटणी आली आहे. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचं काम करत आहेत. परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. केला नाही दिली. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

मुलांवरही कारवाई करा

अनिल देशमुख यांच्या कंपनीतील घोटाळ्याचा पैसा त्यांच्या मुलांच्या कंपनीत आला आहे. त्याची चौकशी करून देशमुख यांच्या मुलांवरही कारवाई करण्यात यावी. ही आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.

तर यादी वाढणार

सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या यादीतल 12 वा खेळाडू हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांना ही 12 जणांची यादी वाढणार की ही यादी संपली? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री स्वत: घोटाळेबाज आहेत. त्यांनी 19 बंगले बांधले. बायकोच्या नावावर बंगले बांधतात, कुठे गायब करतात माहीत नाही. हे घोटाळे असेच चालू राहिले तर यादी वाढणारच, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

दोन रिसॉर्ट अनधिकृत

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांवरही भाष्य केलं. अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. (anil deshmukh should Declare absconding, kirit somaiya demands)

संबंधित बातम्या:

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, दिवाणी आणि फौजदारी गुन्हेही दाखल होणार; सोमय्यांचा दावा

राजू शेट्टींचा ‘करेक्ट कार्यक्रम’ राष्ट्रवादीतूनच?; राजकीय चर्चांना उधाण; राष्ट्रवादीचं उत्तर काय?, वाचा!

बापरे! 3 वर्षांच्या चिमुकलीला लावलेल्या सलायनमध्ये चक्क झुरळ, रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड

(anil deshmukh should Declare absconding, kirit somaiya demands)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.