“परवानगी दिली नाही तरी, आम्ही अहिल्यादेवी जन्मोत्सव करणारच”; राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपला ठणकावून सांगितलं

राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे यावर्षी विधानपरिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांना हा सोहळा हा शासकीय खर्चातून करण्याची परवानगी मिळवली आहे.

परवानगी दिली नाही तरी, आम्ही अहिल्यादेवी जन्मोत्सव करणारच; राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपला ठणकावून सांगितलं
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 6:05 PM

अहमदनगर : अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवनिमित्त करण्यात येणाऱ्या कार्यक्रमावरून जोरदार वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळे पासून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमावरून वाद होऊ नये यासाठी पोलिसांतून परवानगी घेऊनच कार्यक्रम केले गेले आहेत. त्यामुळे आताही त्यावरूनच वादाला तोंड फुटले आहे. अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्त होणाऱ्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा संघर्ष आता टोकाला गेला आहे.

कार्यक्रमाला परवानगी दिली नाही तरी आम्ही हा कार्यक्रम करणारच या भूमिकेवर आमदार रोहित पवार ठाम राहिले आहेत.

त्यातच हा कार्यक्रमा आम्ही करणारच असा त्यांनी इशारा दिल्यामुळे हा वाद टोकाला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आम्ही स्वागत करणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

अहमदनगरला जिल्ह्यातील चौंडी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मदिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.

मागील वर्षी चौंडी येथे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिन सोहळा पार पडत असताना या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर मधल्या काळात राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे यावर्षी विधानपरिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांना हा सोहळा हा शासकीय खर्चातून करण्याची परवानगी मिळवली आहे.

त्यामुळे या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. मात्र याच वेळेस दरवर्षीप्रमाणे चौंडी या गावात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणुकीसाठी आणि इतर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परवानगी मागितली होती,

मात्र जिल्हा प्रशासनाकडून ही परवानगी नाकारल्यानंतर आता आम्ही कसल्याही परिस्थितीत मिरवणूक काढूच असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे या सोहळ्यावरून आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा संघर्ष टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.