Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

मागील महासभा कोरमच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरली होती. या विरोधात भाजप व काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बुधवार 20 एप्रिल रोजी सुनावणी आहे. तत्पूर्वी इतिवृत्त कायम करण्याचा विषय रद्द करावा अशी मागणी काँग्रेस व भाजपच्या 53 सदस्यांनी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. याशिवाय भाजपच्या सविता मदने यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला होता.

Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला
सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 6:18 PM

सांगली : दफनभूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरच्या मुद्यावरुन महापालिकेच्या महासभेत चांगलाच गदारोळ झाला. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP)च्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. यावेळी भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापौरांसमेरील राजदंड पळवत स्वतःच्या ताब्यात घेतला. यानंतर महापौर सभागृहातून निघून गेले. फेब्रुवारीमध्ये कोरम नसतानाही महापौर यांनी कामकाज पूर्ण केले. या विरोधात काँग्रेस-भाजपने मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. पण, ही याचिका फेटाळल्यामुळे आज भाजप-कॉंग्रेसच्या नगरसेवकांना सभा चालू द्यायची नव्हती म्हणून गोंधळ घातला, असा आरोप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी गदारोळ घालणाऱ्या नगरसेवकांवर केला आहे. (Argument of Congress and BJP corporators in Sangli Municipal Corporation General Assembly)

सभा नियमाप्रमाणे पार पडल्याचा महापौरांचा दावा

दरम्यान सभा नियमाप्रमाणे पार पडली, असा दावा महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी केला. तर ही सभाच बेकायदेशीर होती. महापौर अल्प मतांमध्ये आले आहेत. याची जाणीव झाल्यानेच त्यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभागृहातून पळ काढला. यापुढे अशा कारभाराला संघटीतपणे विरोध करू, असा इशारा भाजप गटनेने विनायक सिहसने, जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिला. तर असा कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा उपमहापौर उमेश पाटील, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांनी दिला. महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मागील सभेचे (18 फेब्रुवारी) इतिवृत्त कायम करण्याचा विषय अजेंड्यावर होता.

मागील महासभेबाबत 20 एप्रिलला सुनावणी

मागील महासभा कोरमच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरली होती. या विरोधात भाजप व काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बुधवार 20 एप्रिल रोजी सुनावणी आहे. तत्पूर्वी इतिवृत्त कायम करण्याचा विषय रद्द करावा अशी मागणी काँग्रेस व भाजपच्या 53 सदस्यांनी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. याशिवाय भाजपच्या सविता मदने यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला होता. यावर चर्चा व्हावी अशी मागणी भाजप व काँग्रेस सदस्यांनी केली. मात्र महापौरांनी याकडे दुर्लक्ष केले. भाजप सदस्यांनी आक्रमक होत महापौरांसमोर धाव घेतली. काँग्रेसचेही अनेक सदस्य यामध्ये सहभागी झाले. त्यांनी संयुक्तरित्या महापौरांना घेराव घातला. चर्चेची मागणी केली. मात्र महापौरांनी त्यांना जुमानले नाही.

महापौरांविरोधात काँग्रेस-भाजपची घोषणाबाजी

भाजपचे युवराज बावडेकर यांनी मागील सभेतील काही मंजूर विषयांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला. भाजप व काँग्रेस सदस्यांचा वाढता विरोध लक्षात घेत राष्ट्रवादीचे नगरसेवकही मैदानात उतरले. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी सर्व विषय मंजूर करण्याची सूचना महापौर सूर्यवंशी यांना केली. काँग्रेसचे मंगेश चव्हाण, मयुर पाटील यांनी महापौरांना संरक्षण दिले. वाढत्या गोंधळातच महापौर सूर्यवंशी यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा गुंडाळली. सभागृहातून बाहेर जात असताना स्थायी सभापती निरंजन आवटी यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी त्यांना अडविले. पुन्हा सभा सुरू करण्याची विनंती केली. मात्र त्यांना चकवा देत महापौर सभागृहातून निघून गेले. यामुळे आक्रमक झालेल्या भाजप व काँग्रेस नगरसेवकांनी महापौर पळाले, महापौर पळाले अशा घोषणा देत संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. यावेळी महिला नगरसेविकांनी राजदंड ताब्यात घेतला होता. (Argument of Congress and BJP corporators in Sangli Municipal Corporation General Assembly)

इतर बातम्या

Karnataka Bus Siezed : सांगलीच्या न्यायालयाचा कर्नाटकला दणका, नुकसान भरपाई न दिल्याने बस जप्त

Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; आरोपी मंत्रिपुत्र आशिष मिश्राचा जामीन रद्द

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.