ना रस्ते ना पूल; वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून करावा लागतो धोकादायक प्रवास

पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहते. या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे.

ना रस्ते ना पूल; वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून करावा लागतो धोकादायक प्रवास
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:20 PM

पालघर : पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या दुर्गम भागात ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि पूल नाही. नागरिकांना वाहत्या नद्यांमधील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं वारंवार उघड होतंय. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नाही. येथील नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.

पाड्यांची लोकसंख्या ५००

कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षा अधिक आहे. मात्र गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागते. या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते.

चार महिने नदी दुथळी वाहते

पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहते. या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे. दुसऱ्या बाजूला गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते. अशी माहिती उपसरपंच मोहन मोडक यांनी दिली.

पिंजाळ नदीवर पुलाची मागणी

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत आहे. याकडे प्रशासन आणि सरकार मात्र डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातील नागरिकांना गावा बाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

शेकडो पाड्यांवर नाहीत रस्ते

पालघर जिल्ह्यात आजही शेकडो गावपाड्यांवर जाण्यासाठी मुख्य रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना गावाबाहेर ये-जा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. मुंबई, ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात हे भीषण वास्तव दिवसेंदिवस उघड होत आहे. सरकार याची दखल कधी घेणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.