म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे म्हशी पळवण्याच्या कार्यक्रम आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे. या कार्यक्रमातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
SOLAPUR BUFFELO
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 10:55 PM

सोलापूर : आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे म्हशी पळवण्याच्या कार्यक्रम आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे. या कार्यक्रमातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचेसुद्धा पालन केले नव्हते. याच कारणामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. जेलरोड पोलीस ठाण्यात यासंबंधी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against ten people for violating corona rules who involved in solapur buffalo running program)

कार्यक्रमामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे रस्त्यावर म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक लोकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. तसेच लोकांनी सोशल डिस्टन्सिंगसद्धा पाळले नाही.

पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली

कार्यक्रमामध्ये झालेल्या या सर्व गर्दीचा व्हिडीओ नंतर समोर आला होता. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली होती. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काही लोकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी कार्यक्रमादरम्यान गर्दीस कारण ठरलेल्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडीओ :

पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा काळात सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे. नियमांची पायमल्ली होत असेल तर कोरोना पसरायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भल्या पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, गर्भधारणा झाल्यानंतर अखेर डॉक्टरांना समजलं, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना

(case registered against ten people for violating corona rules who involved in solapur buffalo running program)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.