अहमदनगर : कोपरगाव (Kopargaon) विधानसभा मतदार संघात काळे आणि कोल्हे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी. काळे-कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्षात हा सर्वश्रृत आहे. दोन्ही परिवाराची तिसरी पिढी आता राजकारणात (Politics) आहे. माजी खासदार स्वर्गीय शंकरराव काळे (Shankarao Kale) यांचे नातू राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. आमदार काळे हे नादी लागालं तर ठोकून काढू असं म्हणतायत. तर विवेक कोल्हेंनी काळे यांना अंगावर आले तर शिंगावर घेऊ असं प्रतिउत्तर दिलंय. त्यामुळं राजकीय वातावरण भलतच तापल्याचं सध्या पहायला मिळत आहे.
काळे-कोल्हे गटात नेहमीच संघर्ष होत असतो. दहीहंडीच्या स्वागत कमानीवरून तीन दिवसांपूर्वी दोन्ही गट आमनेसामने भिडले. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी दहीहंडी कार्यक्रमाच्या मंचावरून थेट विरोधकांना धमकीवजा इशारा दिला. आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काहींना वाटतंय सरकार बदललंय. सरकार आमचं आहे. त्यामुळं उत्साह वाढलाय. त्यांचा पण त्यांनी विसरू नये. आमदार बदललेला नाही. त्यांना जशास तसं उत्तर मिळेल. असं राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे म्हणाले.
याला उत्तर देताना सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त झालेले आमदार आहेत. अल्पमताने ते निवडून आले. याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. हाणामारीच्या गप्पा मारू नका. विकासाच्या गप्पा मारा. आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेऊ त्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये, असे प्रत्युत्तर काळे यांचे विरोधक भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी दिलंय. काळे आणि कोल्हे घराणं राजकारणातील मोठं प्रस्थ मानल जातं. काळे – कोल्हे यांच्यात पारंपरिक राजकीय लढाई कित्येक दशकांपासून सुरू आहे. सुसंस्कृत राजकारण करणारे घराणे अशी ओळख काळे – कोल्हे यांची ओळख असताना त्यांची तिसरी पिढी आता हाणामारीची भाषा करू लागलीय.