Sangli Attack : सांगलीत उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, जॉगिंगवेळी घडला धक्कादायक प्रकार

या हल्ल्यात गेडाम यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. सदरच्या अज्ञाता पैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रकार केला होता.

Sangli Attack : सांगलीत उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, जॉगिंगवेळी घडला धक्कादायक प्रकार
सांगलीत उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 3:57 PM

सांगली : सांगलीत एका महिला अधिकाऱ्यावर हल्ला (Attack) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी यांना जखमी केले आहे. हर्षलता गेडाम (Harshalata Gedam) असे जखमी महिला उपजिल्हाधिकारीचे नाव आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असताना हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने यात गेडाम यांना मोठी इजा झाली नाही. हाताला किरकोळ जखम (Injured) झाली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. याआधीही आरोपीपैकी एकाने हर्षलता यांच्याशी छेडछाड केली होती.

हल्ल्यात हर्षलता गेडाम यांच्या हाताला किरकोळ जखम

गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडछाड करत उपजिल्हाधिकारी यांच्या दंडाला हात लावून ओढत “चालतेस का”? असं विचारले. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गेडाम यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. सदरच्या अज्ञाता पैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रकार केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Attack on a Deputy Collector female officer who went for a morning jogging Sangli)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.