Video : बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न, सीमाभागात तणावाचं वातावरण

बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला गेला. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. | Belgaum Municipal Corporation

Video : बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न, सीमाभागात तणावाचं वातावरण
बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला गेला. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं.
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 9:19 AM

कोल्हापूर : बेळगाव महानगरपालिकेसमोर (Belgaum Municipal Corporation) पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला गेला. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगाव मध्ये पुन्हा एकदा तणाव पाहायला मिळत आहेत. (Attempt to hoist red and yellow flag in front of Belgaum Municipal Corporation once again)

ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधी लावलेला लाल पिवळा ध्वज खराब झाल्याचे कारण देत नवीन ध्वज फडकवण्याचा कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला.

अनधिकृत ध्वजावरुन गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण आहे. त्यात कालच्या प्रकाराने अजून तणावात वाढ झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करुन तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं काय घडलं?

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड ध्वजस्तंभ 28 डिसेंबर 2020 रोजी स्थापित करण्यात आला होता. 6 महिन्यांपासून ऊन, वारा, पावसामुळे ध्वज फाटला असल्याचं कारण देत तोच ध्वज बदलण्याची मागणी होत असताना जुना ध्वज काढून नवीन बसवण्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिथेच जोरदार राडा केला.

गेले अनेक दिवस आवाहन करून देखील जिल्हा प्रशासन यासंदर्भात पाऊल उचलत नाही. ध्वज खांबावरती नवीन ध्वज बसवत नाही. मग आम्हीच नवीन ध्वज बसवण्यासाठी निघालो होतो, पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

ध्वजारोहन करण्यासाठी कार्यकर्ते निघाले असता दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. पोलीसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या बद्दल कार्यकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला तसेच पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

(Attempt to hoist red and yellow flag in front of Belgaum Municipal Corporation once again)

हे ही वाचा :

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.