Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Crime : हातकणंगलेत अडिच वर्षाच्या बाळाचा विक्रीचा प्रयत्न; पाच जणांना अटक

सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातील आणखी एक आरोपी महेश चौधरी राहणार नांदेड हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच यातील लहान बाळाबाबत कोणाला काही माहिती असल्सया त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Kolhapur Crime : हातकणंगलेत अडिच वर्षाच्या बाळाचा विक्रीचा प्रयत्न; पाच जणांना अटक
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 10:26 PM

कोल्हापूर : हातकणंगले बसस्थानक परिसरात अडिच वर्षाच्या बाळाच्या विक्री (Baby Selling)च्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना हातकणंगले पोलिसांनी सापळा रचून अटक (Arrest) केली. तर यातील एक जण फरार (Absconding) झाला आहे. संतोष पुरी, शिवपुरी गोस्वामी (40, रा. बेकाराई तालुका सारडा जिल्हा भीलवाडा राज्य राजस्थान), दिनेश नंदलाल बनभैरू (36, रा. लाडा प्लॉट अकोला नाका वाशिम जिल्हा),  कुसुमबाई देविदास गायकवाड (40, रा. राहुल नगर नांदेड), लक्ष्मी आदेश खरे (40, तेरा नगर नांदेड), ललिता भिसे (रा. कोरोची तालुका हातकणंगले) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पकडले

हातकणंगले येथील बसस्थानकात अडिच वर्षाच्या बालकाच्या विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संतोष पुरी, शिवपुरी गोस्वामी, दिनेश नंदलाल बनभैरू,  कुसुमबाई देविदास गायकवाड, लक्ष्मी आदेश खरे, ललिता भिसे यांना त्यांच्या ताब्यातील लहान बाळासह ताब्यात घेण्यात आले. संबंधित बाळास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातील आणखी एक आरोपी महेश चौधरी राहणार नांदेड हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच यातील लहान बाळाबाबत कोणाला काही माहिती असल्सया त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.