Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Lockdown | बारामतीनंतर साताऱ्यात कडक लॉकडाऊन, सांगलीमध्ये कोरोना रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावणार

सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन तर सांगली मनपा क्षेत्रात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. Satara lockdown Sangli Janata Curfew

Satara Lockdown | बारामतीनंतर साताऱ्यात कडक लॉकडाऊन, सांगलीमध्ये कोरोना रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 5:39 PM

सातारा: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. दुसरीकडे सांगली मनपा क्षेत्रात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि सांगली मनपा प्रशासन यांनी सहमतीनं हा निर्णय घेतला आहे. (Balasaheb Patil said strict lockdown imposed in Satara and Sangli Municipal Corporation implemented Janata Curfew from 5 May)

बाळासाहेब पाटील काय म्हणाले?

राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या परिस्थिती सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन दिवासात 2500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळं लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, सीईओ यांच्याशी चर्चा केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा अधिक करण्यासाठी सूचना केली, अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.

साताऱ्यात उद्यापासून लॉकडाऊन

सातारा जिल्हा प्रशासनाकडून संध्याकाळपर्यंत लॉकडाऊनसंदर्भातील गाईडलाईन्स जारी केल्या जातील. गाईडलाईन्स आज जारी केल्यातरी उ्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी या गाईडलाईन्सचं पालन करुन जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावं, असं आवाहन, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.

सांगलीत जनता कर्फ्यू

सांगली मनपा क्षेत्रात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या रुग्णाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने निर्णय घेतलाय. 5 मे पासून सात दिवस जनता कर्फ्यू लागणार आहे. जनता कर्फ्यूच्या काळात 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्री साठीं होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे.

बारामतीमध्येही लॉकडाऊन

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामती मतदारसंघात कडक लॉकडाऊन (Baramati Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. बारामतीत येत्या बुधवारपासून (परवा, 5 मे 2021) सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.   बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 5 ते 11 मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन असेल.

संबंधित बातम्या:

तब्बल 15 दिवसानंतर लासलगाव बाजार समिती सुरु, पहिल्याच दिवशी कांद्याला इतका भाव

Baramati Lockdown | पवारांच्या बारामतीत कडक लॉकडाऊन, सात दिवसांसाठी निर्बंध लागू होणार

(Balasaheb Patil said strict lockdown imposed in Satara and Sangli Municipal Corporation implemented Janata Curfew from 5 May)

फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर.
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड.
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?.
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?.
नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, CM म्हणाले, 'त्यांना कबरीतूनही...'
नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, CM म्हणाले, 'त्यांना कबरीतूनही...'.
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.