राहाता / अहमदनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊन निकालही हाती आले आहेत. त्यानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या युती करून बाजार समितींवर आपापले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यावर आज महसूल मंत्री यांनी बोलताना विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. बाजार समितींच्या निवडणुकांच्या निकालामुळे प्रादेशिक राजकीय आशा आकांक्षांना महत्व प्राप्त झाल्यामुळे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना जोरदार टोला लगावला आहे.
संगमनेरमध्ये भाजप उमेदवारांना पडलेलं मतदान बाळासाहेब थोरातांना अंजन घालणारे आहे मत त्यांनी मांडले आहे. या कृषी बाजार समितीच्या निकालांचे थोरातांनी आत्मपरीक्षण करावे असंही त्यांनी विश्वासाने म्हटले आहे.
या निकालाविषयी विश्वासाने बोलताना त्यांनी सांगितले की, राहात्यात शेतकऱ्यांनी जनसेवा मंडळावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे संगमनेरमधील राजकीय दहशत मोडीत काढण्याचे काम मतदारांनी केल्याचा घणाघातही त्यांनी बाळासाहेब थोरातांवर केला आहे.
संगमनेर तालुक्यातील राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दहशत कुणाची..? असा सवाल उपस्थित करून तिथले लोक प्रचंड दहशतीखाली होते. त्यामुळे लोकांनीही मतपेटीतून त्या दहशतीला उत्तर दिले आहे असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
आमचा पराभव झाला असला तरी मिळालेल्या मतांची संख्या जास्त आहे. यावेळी त्यांनी या निकालाचा संदर्भ आपल्या विधानसभेच्या निकालाबरोबर जोडत.
राहाता तालुक्यात दहशत नसल्यामुळे विधानसभेला सर्वात जास्त मताधिक्य मला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचे शल्य काही लोकांना आहे असा टोला त्यांनी नाव न घेता विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.
भाजपने मला दिलेल्या संधीचे सार्थक करतो आहे असंही त्यांनी या निकालानंतर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांविषयी मत व्यक्त करताना सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा विश्वासही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात सध्या भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर्स बाजी सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आणि आमदार जयंत पाटील यांची पोस्टर्स झळकल्यामुळे त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे हेच सिद्ध होत आहे.
तसेच या निमित्ताने आपल्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.2024 च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून त्यावेळीही पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मविआमध्ये भविष्यकारांची संख्या जास्त असून महाविकास आघाडीत फूट पडणार नाही नाही याचीही त्यांनी चिंता करावी असा टोला त्यांनी मविआला लगावला आहे.