Vasai Tourist Place : राजीवली वाघरालपडा दुर्घटनेनंतर वसई तालुक्यात पर्यटन स्थळांवर बंदी, कलम 144 लागू

पर्यटन स्थळावर किंवा स्थळापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत पर्यटकांना मनाई आदेश जारी केला आहे. या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) हेही लागू केले आहे.

Vasai Tourist Place : राजीवली वाघरालपडा दुर्घटनेनंतर वसई तालुक्यात पर्यटन स्थळांवर बंदी, कलम 144 लागू
राजीवली वाघरालपडा दुर्घटनेनंतर वसई तालुक्यात पर्यटन स्थळांवर बंदी
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 7:26 PM

वसई : मुसळधार पाऊस आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना (Incident) लक्षात घेत वसई तालुक्यात पर्यटन स्थळां (Tourist Places)वर बंदी (Prohibited) लागू करण्यात आली आहे. मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातून कलम 144 लागू केले आहे. काल वसईतील राजीवली वाघरालपाडा येथे एका चाळीतील एका घरावर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मान्सून काळात निसर्गाचा, तसेच धबधबे, तलाव, धरण, समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्य प्रमाणात येतात. अतिवृष्टीमध्ये पर्यटकांची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील यांनी आजपासून पर्यटन स्थळ, धोकादायक परिसरावर मनाई आदेश जारी केला.

पर्यटन स्थळापासून 1 किमी अंतरापर्यंत जाण्यास मनाई

पर्यटन स्थळावर किंवा स्थळापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत पर्यटकांना मनाई आदेश जारी केला आहे. या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) हेही लागू केले आहे. पर्यटन स्थळावर पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याच्या उगमस्थान जाणे किंवा पोहणे, सेल्फी काढणे, नैसर्गिक पर्यटन किंवा धोकादायक ठिकाणी मद्यपान करणे, बाळगणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे किंवा चालवणे, या सहा अन्य काही बाबींवर पोलिसांनी मनाई आदेश लागू केला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवरही मनाई आदेश

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, बारवी नदी, चिखलोली अशी जवकल्पास सात ते आठ पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहली आणि पिकनिकसाठी येत असतात. मात्र इथं आल्यानंतर पाण्याचा अंदाज न येणं, मद्यपान करून पाण्यात उतरणं आणि अशा अनेक गोष्टींमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेकांचे अपघात होतात. या म्हणून यंदाच्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 4 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या 3 किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे. (Ban on tourist places in Vasai taluk after Rajivli Waghralpada incident)

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.