VIDEO: पोलिसांनी कारवाई केली, बंडातात्यांनी त्यांनाच स्वतःच्या हाताने भाकरी करुन जेवू घातलं

बंडातात्या कराडकरांनी स्वतःच्या हाताने भाकरी बनवून तिथं ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेऊ घातलंय. त्याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

VIDEO: पोलिसांनी कारवाई केली, बंडातात्यांनी त्यांनाच स्वतःच्या हाताने भाकरी करुन जेवू घातलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 6:40 PM

सातारा : पायी वारी करण्याच्या मागणीवर अडलेल्या बंडातात्या कराडकर महाराजांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच त्यांच्या घरी स्थानबद्ध केलं. मात्र, बंडातात्या कराडकरांनी स्वतःच्या हाताने भाकरी बनवून तिथं ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेऊ घातलंय. त्याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. तसेच ज्यांनी कारवाई केली त्यांना घरी जेवू घालून बंडाता त्यांनी वारकरी संप्रदायाचा खरा संदेश दिल्याचं मत अनेकजण व्यक्त करत आहेत. यावर संभाजी भिडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत बंडातात्या कराडकर यांचं कौतुक केलंय (Bandatatya Karadkar cook food for police in Karad after police action due to Wari).

आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आग्रह धरत आंदोलन करणाऱ्या बंडातात्या कराडकरांना पुणे पोलिसांनी आळंदी येथुन ताब्यात घेतलं आणि कराडमधील करवडी येथे आश्रमात आणून त्यांना स्थानबद्ध केलंय. बंडातात्या कराडकर यांना आश्रमात सोडताच त्यांनी स्नान करुन पूजा केली. त्यानंतर स्वतःच्या हाताने आमटी भाकर बनवून पोलिसासह जेवण केलं. पोलीस त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांचं कर्तव्य करत आहेत, मी माझं काम करतोय. त्यामुळो पोलिसांनी माझ्यासोबत जेवलं पाहिजे असं म्हणत त्यांनी पोलिसांना आपल्या घरी जेऊ घातलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

“मी पूजा झाल्याशिवाय पाणीही घेत नाही, पोलिसांनी त्यांचं काम केलं, माझी तक्रार नाही”

भोजनानंतर माध्यमांशी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले, “पुणे येथून पायी वारी आंदोलनातून पोलिसांनी मला थेट कराडला आणले. मी पूजा झाल्याशिवाय पाणीही घेत नाही. माझे जागी दुसरा कोणी असता, तर वाईट हाल झाले असते. पोलिसांनी त्यांचे काम केले माझी तक्रार नाही.”

संभाजी भिडे म्हणाले, “ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी त्यांच्या घरी स्थानबद्ध केले, पण बंडातात्यांनी पोलिसांना स्वतःच्या हाताने जेवण बनवून पोटभर जेऊ घातलं. वारकरी संप्रदाय किती उदात्त भावनेचा व मोठ्या मनाचा आहे हे तात्यांनी दाखवून दिले. “अमृत तें काय गोड आह्मापुढें | विष तें बापुडें कडू किती || तुका म्हणे आह्मी अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ||”

हेही वाचा :

वारीवर बंदी घालून द्रौपदीच्या पदाराला हात घालण्याचं सरकारकडून पाप,संभाजी भिडे यांची टीका

बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी : प्रविण दरेकर

बंडातात्या कराडकर कोण आहेत? ज्यांना पोलीसांनी अटक केलीय?

व्हिडीओ पाहा :

Bandatatya Karadkar cook food for police in Karad after police action due to Wari

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.