बारामतीच्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पीकविम्याचा 25 टक्के अॅडव्हान्स मिळणार
Crop Insurance | 21 जुलै ते 25 ऑगस्ट या कालावधीत पाऊस न पडल्याने बारामती व इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता पीकविम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम देऊन या शेतकऱ्यांची मदत केली जाणार आहे.
बारामती: इंदापूर आणि बारामतीमधील शेतकऱ्यांना लवकरच पीकविम्याचे आगाऊ पैसे मिळणार आहेत. पीकविम्याच्या एकूण रक्कमेपैकी 25 टक्के रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळेल. (Farmers will get crop insurance scheme advance in Maharashtra)
21 जुलै ते 25 ऑगस्ट या कालावधीत पाऊस न पडल्याने बारामती व इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता पीकविम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम देऊन या शेतकऱ्यांची मदत केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी दिली.
सोमेश्वर सहकारी कारखान्याकडून ऊसाला 3100 रुपयांचा भाव
सोमेश्वर सहकारी कारखान्याकडून ऊसासाठी प्रतिटन 3100 रुपयांचा भाव निश्चित करण्यात आला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने नुकताच हा निर्णय घेतला. 2020-21 या हंगामात तुटून गेलेल्या उसासाठी हा भाव लागू असेल. हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे. आता इतर साखर कारखाने ऊसाला किती भाव देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बारामतीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी
बारामती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहर आणि तालुक्यातील रुग्णांसाठी पुरेसे बेड, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामतीतील शासकीय रुग्णालयांसह मॉड्युलर हॉस्पिटलही उपलब्ध असेल. याशिवाय, शहरातील खासगी कोव्हिड सेंटरही ठेवणार सुसज्ज ठेवण्यात येतील. तर लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
मिरचीला पीक विम्यातून वगळल्याने शेतकरी हतबल
नंदुरबार जिल्हा हा राज्यातील मिरचीचे आगार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जातं. मात्र यावर्षी पीक विम्यातून मिरची पिकाला वगळण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीने मिरची पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कुठली नुकसान भरपाई मिळणार नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जात असते. यावर्षीही पाऊस कमी असतानाही मिरचीच्या क्षेत्रात थोडीफार घट आली आहे. यावर्षी सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर आतापर्यंत मिरचीची लागवड झाली असून, सरकारने पीक विम्यातून मिरची पिकाला वगळले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा आणि मिरचीचा पीक विम्यात समावेश करावा, त्यासाठी भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करेल, मात्र राज्य सरकारनेही शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहावे, असं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलं.
संबंधित बातम्या:
भारतातील जर्दाळूचे दुबईतील लोकही दीवाने, एकदा झाड लावल्यावर 50 वर्षे करु शकता लाखोंची कमाई
लाल रंगाची भेंडी : शेती करणाऱ्यांना मिळतेय 10 पट अधिक किंमत, ‘या’ आजारांपासून सुरक्षितता
(Farmers will get crop insurance scheme advance in Maharashtra)