Sumant Ruikar : शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीचं निधनानं बीडवर शोककळा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्याच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे (Tirupati Balaji) पायी प्रवास करत निघाले होते.

Sumant Ruikar : शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीचं निधनानं बीडवर शोककळा
सुमंत रुईकर
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 7:57 AM

बीड: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्याच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे (Tirupati Balaji) पायी प्रवास करत निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्यानं कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळं बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय त्यांनी केला होता. 1 डिसेंबरपासून ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावं म्हणून सुमंत रुईकर चालत जात होते.

तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीचं मृत्यूनं गाठलं

सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला 31 डिसेंबरला पोहोचण्याचा संकल्प केला होता. मात्र, ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अखेर, शनिवारी दुपारी सुमंत रुईकर यांची प्रकृती खालावल्यानं निधन झालं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणूनही पायी यात्रा

सुमंत रूईकर यांच्या मृत्युने बीड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रभागी असणार्‍या सुमंत रुईकर यांचा मित्र परिवार सर्व पक्षांमध्ये होता. मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व्यक्ती म्हणून रूईकर यांच्याकडे पाहिले जात होते.सुमंत रूईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरूपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करत सत्कार केला होता.

इतर बातम्या:

Omicron : जानेवारीत देशात कोरोनाची तिसरी लाट? अलर्ट न झाल्यास स्थिती बिघडेल, तज्ज्ञांचा इशारा

Jalgaon : खडसे कुटुंबाकडून जीवाला धोका, चंद्रकांत पाटलांचा दावा; महिलांच्या प्रश्नावरुन रोहिणी खडसेंची चोप देण्याची भाषा

Beed Shivsena Worker Sumant Ruikar died in Karnataka started who going to Tirupati by walking for better health of Uddhav Thackeray

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.