Kolhapur Ambabai : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या किरणोत्सवाला सुरुवात, भाविकांना पुढील दोन दिवस अनुभवता येणार सोहळा

साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा दरवर्षी सुर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन काळामध्ये होत असतो. नोव्हेंबर महिन्यातील सूर्याच्या दक्षिणायनात 9, 10, 11 तर उत्तरायणात 31 जानेवारी 1 व 2 फेब्रुवारीला किरणोत्सव होत असतो.

Kolhapur Ambabai : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या किरणोत्सवाला सुरुवात, भाविकांना पुढील दोन दिवस अनुभवता येणार सोहळा
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या किरणोत्सवाला सुरुवात
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:25 PM

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरा(Ambabai Temple)तील नव्या वर्षातील पहिला उत्तरायणातील किरणोत्सव(Kiranotsav) सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी मावळतीची किरणे पूर्णक्षमतेने देवीच्या किरीटापर्यंत पोहोचली. त्यामुळे हा किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने पार पडला. सुरुवातीला 05:18 मिनिटांनी सूर्याची किरण महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर गरुड मंडप, कासव चौक असा प्रवास करत सूर्यकिरणांनी सहा वाजून 15 मिनिटांनी देवीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर 06:18 मिनिटांनी किरणे देवीच्या किरीटावर स्थिरावून लुप्त झाली. आज पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्यानं भाविकांतूनही समाधान व्यक्त होत आहे. पुढचे दोन दिवस भाविकांना हा किरणोत्सव सोहळा अनुभवता येणार आहे. (Beginning of Ambabai Kirnotsava of Kolhapur, devotees will be able to experience the festival for the next two days)

वर्षातून दोन वेळा होतो किरणोत्सव सोहळा

साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा दरवर्षी सुर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन काळामध्ये होत असतो. नोव्हेंबर महिन्यातील सूर्याच्या दक्षिणायनात 9, 10, 11 तर उत्तरायणात 31 जानेवारी 1 व 2 फेब्रुवारीला किरणोत्सव होत असतो. स्थापत्य शास्त्राचा नमुना असलेल्या मंदिरातील किरणोत्सव सोहळा खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी असते. मात्र गेल्या काही वर्षापासून किरणोत्सव मार्गात आलेल्या अडथळ्या मूळ किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नव्हता.

किरणोत्सवाच्या वेळा

महाद्वार कमान 5 वाजून 32 मिनिटे गरुडमंडप पाठीमागे 5 वाजून 36 मिनिटे गरुद्मंडप मध्यभागी 5 वाजून 42 मिनिटे गणपती पाठीमागे 5 वाजून 53 मिनिटे कासव चौक 6 वाजून 1 मिनिटे पितळी उंबरा 6 वाजून 4 मिनिटे चांदीचा उंबरा 6 वाजून 8 मिनिटे गर्भ कोटी 6 वाजून 13 मिनिटे चरण स्पर्श 6 वाजून 15 मिनिटे कमरेपासून किरीट 6 वाजून 18 मिनटे (Beginning of Ambabai Kirnotsava of Kolhapur, devotees will be able to experience the festival for the next two days)

इतर बातम्या

आधी रेनॉल्ट डस्टरची काच फोडली, मग शंभर शंभरचे बंडल लंपास केले! नांदेडमध्ये चोरांचा सुळसुळाट

चंद्रपूर : जीव धोक्यात घालून वाघांचे छायाचित्र; ‘त्या’ छायाचित्रकारांवर वनविभागाकडून कारवाईचा इशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.