‘Srivalli’वर रील्स पाहिल्या असतील, आता भजन ऐका तेही मराठमोळ्या स्टाइलमध्ये; Video Viral
अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा (Pushpa The Rise) सिनेमाची क्रेझ अजूनही कमी होताना दिसत नाहीय. सिनेमाप्रमाणेच त्यातल्या गाण्यांनीही तरुणांना भुरळ घातलीय. सिनेमातलं श्रीवल्ली (Srivalli Song) हे गाणंही असंच हीट झालंय. या गाण्यावर भजन (Bhajan)ही तयार झालंय. पाहू या...
सिंधुदुर्ग : अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा (Pushpa The Rise) सिनेमाची क्रेझ अजूनही कमी होताना दिसत नाहीय. सिनेमाप्रमाणेच त्यातल्या गाण्यांनीही तरुणांना भुरळ घातलीय. सिनेमातलं श्रीवल्ली (Srivalli Song) हे गाणंही असंच हीट झालंय. हे गाणं आपल्याला आसपासला नेहमीच ऐकायला मिळतंय. सोशल मीडियावर गेलात तर तिथंही तुम्हाला असंख्य रील्स दिसून येतील. हे रील्स मनोरंजनात्मक असतात. त्यामुळे व्हायरलही प्रचंड वेगानं होतात. श्रीवल्ली गाण्यावरचं एक वेगळाच व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. श्रीवल्ली गाण्यावर तरुणाई रील्स बनवताना तुम्ही तर पाहिलंय. मात्र या गाण्यावर भजन (Bhajan) होऊ शकतं असा कधी विचार केलाय का? नाही ना! चला श्रीवल्ली गाण्यावरचं मराठमोळं भजन पाहू या…
भजनी मंडळाचा व्हिडिओ
श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आपल्याला श्रीवल्ली गाणं ऐकायला मिळेल. अस्सल मराठमोळ्या स्टाइलमध्ये हे गाणं ते गात असताना दिसून येतंय. मात्र ते गाण्याच्या स्वरुपात नाही, तर भजनाच्या स्वरुपात ते गात आहेत. भजनाला श्रीवल्ली गाण्याची चाल लावून ते सादर करताना आपल्याला दिसून येईल.
साथसंगतही भारीच
देवगड तालुक्यातल्या लिंगडाळ या ठिकाणचं हे भजनी मंडळ असून व्हिडिओत आपल्याला भजनी मंडळातले सदस्य दिसत आहेत. पेटीवर एक व्यक्ती श्रीवल्ली गाण्याच्या चालीवर भजन करताना दिसत आहे. त्याला उपस्थित सदस्य साथ देत आहेत. तबलजीदेखील शेजारी आपल्याला दिसून येत आहेत. तबल्यासह मृदंग, टाळ यामुळे एक वेगळाच फील आपल्याला पाहताना आणि ऐकताना येतो. शेजारी एक जण या सगळ्याचा व्हिडिओ शूट करत असल्याचंही दिसतंय. तुम्हीही हे मराठमोळ्या स्टाइलमधलं गाणं पाहा…
‘Srivalli’वर रील्स पाहिल्या असतील, आता भजन ऐका तेही मराठमोळ्या स्टाइलमध्ये; Video Viral@alluarjun @PushpaMovie #srivallisong #ViralVideo #Viral #Trending #SocialMedia #Maharashtra #bhajan #sindhudurg #MarathiNews pic.twitter.com/O8zpaJBqGp
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2022