भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 5 कोटी 93 लाखांचा फटका; चेन्नईच्या कंपनीने कागदपत्रे लपविली, दोघांना अटक

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिलेल्या तक्रारीनुसार भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र-३ हदगाव आणि युनिट क्र-४ वाघलवाडा यांच्या साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या एका कंपनीला दिले होते.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 5 कोटी 93 लाखांचा फटका; चेन्नईच्या कंपनीने कागदपत्रे लपविली, दोघांना अटक
साखर कारखाना
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 2:54 PM

नांदेड: जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 5 कोटी 93 लाखांचा फटका बसला आहे. चेन्नईच्या एका कंपनीने विश्वासघात करून 5 कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपयांचा चुना लावला आहे. यातील दोघांना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.भांबरे यांनी 4 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिलेल्या तक्रारीनुसार भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र-३ हदगाव आणि युनिट क्र-४ वाघलवाडा यांच्या साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर भाऊराव कारखान्याला केंद्र शासनाकडून प्रतिटन काही आर्थिक मदत मिळत असते. पण संबंधित कंपनीने मात्र निर्यात केल्याची कुठलीही कागदपत्रे न सादर करता इंडोनेशिया या देशाने तुमची साखर नाकारली असल्याचा ईमेल पाठवला. पण त्यांच्याकडे अशी कुठलाही पुरावा नसल्याचे कारखान्याच्या लक्षात आले. यामुळे केंद्र शासनाकडून मिळणारी रक्कम 5 कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपये आता मिळणार नाही. संबंधित कंपनीने कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यानंतर दि.22 ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 406 , 420 , 467 आणि 34 नुसार दाखल झाला.

दोघांना पोलीस कोठडी

या प्रकरणात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची 5 कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. साखर विक्री संदर्भाने हा प्रकार घडला आहे. साखर सरकारला विक्री करण्यात आली होती. ती सरकार कोणती या बाबत माहिती प्राप्त झाली नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्यंत गोपनिय पध्दतीने याचा तपास सुरू होता. दाखल झालेला गुन्हा क्रमांक 86 चा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तामिळनाडु येथील चेन्नईमध्ये राहणारा प्रदीपराज चंद्राबाबू (43), व रुही ता.अहमदनगर येथील अभिजित वसंतराव देशमुख या दोघांना नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. अभिजित देशमुखची पोलीस कोठडी आज दि. 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. यातील ब्रोकर म्हणून काम करणारा अभिजित देशमुख मागील सात दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. बारड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 86/2021 सर्वच अभिलेखातून बाहेर ठेवण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने आज अभिजित देशमुखसह प्रदीपराज चंद्राबाबू आणि इंडिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता रा.गंगानगर आनंदपूर आंध्रप्रदेश अश्या तिघांना मुदखेड न्यायालयात हजर करून देशमुखची पोलीस कोठडी वाढवून देण्याची आणि प्रदीपराज आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ऍड.जे.एन.वडेर यांच्यावतीने केली. न्या.भामरे यांनी अभिजित देशमुख यांना न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून न देता न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यांच्यावतीने अँड , नवनाथ पंडित यांनी जामीन मिळावा असा अर्ज केला आहे.

4 सप्टेंबरला सुनावणी

सरकारी वकील ऍड.जे.एन.वडेर यांनी वेळ मागितला आहे. त्यावर सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. अर्थात देशमुख आता तुरुंगात जातील, उर्वरित पकडलेले आरोपी प्रदीपराज चंद्राबाबू आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता या दोन जणांना न्या. एस.बी.भांबरे यांनी 4 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. यात मात्र कारखान्याने आणि पोलीस प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळल्यामुळे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

इतर बातम्या:

यूरीयाची चढ्या दरानं विक्री, शेतकऱ्याकडून भांडाफोड; कृषी विभागात खळबळ, कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

Bhaurao Chavan sugar mill lost five crore ninety three lakh rupees due to Chennai based company two arrested

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.