पोलीस उपनिरीक्षकांचा असाही दिलदारपणा, वाढदिवसानिमित्त केलेल्या या कामाचे सर्वांकडून कौतुक

थेट लक्ष्मीपूर येथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. आपुलकीने विचारपूस करून त्यांना सोबत आणलेली छोटीशी मदत केली.

पोलीस उपनिरीक्षकांचा असाही दिलदारपणा, वाढदिवसानिमित्त केलेल्या या कामाचे सर्वांकडून कौतुक
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 5:19 PM

मोहम्मद इरफान, प्रतिनिधी, गडचिरोली : आज एका पोलीस उपनिरीक्षकांचा वाढदिवस होता. सकाळी व्हॉट्स मॅसेज पाहत असताना व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून समजले की, 13 जून 2023 रोजी सकाळी एक दुर्घटना घडली. सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त मागास भागातील दुर्गम कुटुंबावर मोठे संकट कोसळले. समया मलया दुर्गम आणि हनुमंतु मलया दुर्गम या दोन सख्या भावांची घरे आगीमध्ये जळून भस्मसात झाली. दुर्गम कुटुंबीयांजवळ काहीही शिल्लक राहिलेले नाही. शक्य असेल त्यांनी मदतीचा हात पुढे करून त्यांना मदत करावी, अशी कल्पना समोर आली. या कल्पनेने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी (पोलीस दादाची खिडकी) माध्यमातून नेहमी समाजउपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याचा एक सकारात्मक विचार पोलीस उपनिरीक्षक किसान कांदे यांच्या मनात आला.

बाजारातून भांडी आणि किराणा सामान खरेदी केला

खासदार साहेबांचा बंदोबस्त करून झाल्यानंतर पोलीस अमलदार प्रकाश मोरे यांना सोबत घेऊन पोलीस उपनिरीक्षक किसान कांदे हे बाजारात गेले. दोन कुटुंबासाठी आवश्यक भांडी आणि किराणा सामान खरेदी केला. त्यानंतर थेट लक्ष्मीपूर येथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. आपुलकीने विचारपूस करून त्यांना सोबत आणलेली छोटीशी मदत केली.

gadchiroli police 2 n

हे सुद्धा वाचा

पीडितांचे चेहरे खूपकाही सांगून गेले

यावेळी दुर्गम कुटुंबातील आणि गावातील इतर नागरिक आणि मुलांना बिस्कीट आणि चॉकलेट यांचे वाटप केले. त्यांना मराठी येत नसल्याने आणि आम्हाला तेलुगू येत नसल्याने योग्य विचारांची देवाण घेवाण झाली नाही. परंतु त्यांचे चेहरे खूप काही सांगत होते, अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक किसान कांदे यांनी दिली.

पीडित कुटुंबाला आणखी कपडे आणि इतर सामानाची गरज लागणार आहे. लवकरच ती पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस उपनिरीक्षक किसान कांदे यांनी गावकऱ्यांसमोर दिली.

समाजासाठी महत्त्वाचा संदेश

शेवटी छोटीशी मदत करून जाणीवपूर्वक हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. संपर्कातील एखाद्या व्यक्तीने भविष्यात अशा संकटाचे वेळी मदत करावी. तर खऱ्या अर्थाने ही बातमी चांगल्या कामासाठी उपयोगी आली, असे म्हणता येईल. कारण वाढदिवस साजरे करण्याची बदलती पद्धत पाहता या पद्धतीने पण साजरा करता येतो, हा एक संदेश समाजात जाईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.