संजय राऊत बोलतात ते त्यांचं वक्तव्य नसतं, त्यांचा बोलावता धनी बोलायला भाग पाडतो, रावसाहेब दानवेंचं टीकास्त्र
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसींचं रद्द झालेले आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.(Raosaheb Danve Sanjay Raut)
जालना: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसींचं रद्द झालेले आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ईडीची रेड, सीबीआयची रेड, मागासवर्गीयांना नोकरीतील पदोन्नती आरक्षण, धनगर समाजाचे व ओबीसीचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आणि केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम हे सरकार करत आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं. यासोबत संजय राऊत जे बोलतात ते त्यांचं मत नसतं त्यांचा बोलवता धनी त्यांना तस बोलायला भाग पाडतो, अशी टीका दानवे यांनी केली. (BJP leadar Raosaheb Danve slam Shivsena leader Sanjay Raut)
संजय राऊत आमचे मित्र, त्यांचा बोलावता धनी वेगळा
रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत हे आमचे मित्र आहेत आणि संजय राऊत जे बोलतात ते त्यांचे मत नसते तर त्यांचा बोलावता धनी त्यांना बोलायला भाग पाडतो असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
निवडणुका लागल्यास ओबीसी उमेदवार देणार
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याची आमची भूमिका आहे. मात्र, निवडणुका घेतल्या तर त्या ठिकाणी भाजपा ओबीसीचे प्रतिनिधी निवडणुकीत देणार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. ओबीसींचं जे आरक्षण रद्द झाले आहे,त्याचा केंद्र सरकारशी संबंध नाही. इंपेरियल डेटा हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून राज्य सरकारने कोर्टाला दिला नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. जो पर्यंत इंपेरियल डेटा राज्य सरकार कोर्टाला देणार नाही तो पर्यंत आरक्षणाला स्थगिती असणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
भाजपचं राज्यभर चक्काजाम आंदोलन
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.
होय, मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली, प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी मिळेल: संजय राऊत https://t.co/iRD1QjB4r1 #SanjayRaut #PratapSarnaik #CMUddhavThackeray #Shivsena #ED
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2021
संबधित बातम्या
आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
तुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? , देवेंद्र फडणवीसांचा सवाल
OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’