देवेंद्रजींना हात लावल्यास महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय… भाजप आमदाराचा इशारा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस बजावली होती. पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळं राज्यातील भाजप (BJP) कार्यकर्ते, नेते आक्रमक झाले होते.
बुलडाणा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस बजावली होती. पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळं राज्यातील भाजप (BJP) कार्यकर्ते, नेते आक्रमक झाले होते. राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. एसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सीआरपीसी 160 प्रमाणे नोटीस दिल्याच्या निषेधार्थ बुलडाण्यात देखील आंदोलन करण्यात आलं. बुलडाण्यात भाजप आमदार आकाश फुंडकर (Akash Phundkar) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना हात लावला तर नोटीस प्रमाणे महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा फुंडकर यांनी दिला. भाजपाने उपविभागीय कार्यालय समोर देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या नोटीसची होळी केली.
आकाश फुंडकर यांचा मविआला इशारा
पोलीस बदली घोटाळ्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागातील अहवाल बाहेर आल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. या प्रकरणावरून खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने आक्रमक होऊन नोटीसची होळी केली. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना हात लावला, तर जशी नोटीस जाळण्यात आली, तसेच महाविकास आघाडी सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.
रावसाहेब दानवे यांच्याकडून मविआवर टीका
भाजपच्या सर्व नेत्यांना जरी चौकशीला बोलावलं तरी आम्ही जायला तयार आहोत. पोलिसांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, फडणवीस यांनी याआधीच केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली होती, फडणवीसांची चौकशी करण्याऐवजी त्यांनी जे पुरावे दिले त्याची चौकशी केली पाहिजे पण या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भाजपच्या सर्व नेत्यांना जरी चौकशीला बोलावलं तरी आम्ही जायला तयार आहोत आम्ही जर चूक केली असेल तर शिक्षा भोगायलाही तयार आहोत पण केंद्रीय यंत्रणा जो तपास करत आहेत. तिकडे निर्दोष असल्याचं महविकास आघाडीतील नेत्यांनी सिद्ध केलं पाहिजे
इतर बातम्या:
Pune :पुण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अजित पवार यांची ग्वाही