VIDEO | गिरीश महाजन पुन्हा ‘संकटमोचक’, जळगावात सापाला पकडून जीवदान, थरार कॅमेरात कैद

गिरीश महाजन आपल्या जळगावातील निवासस्थानी जात होते. त्यावेळी बस स्थानक परिसरात त्यांना गर्दी दिसली. त्यांनी विचारणा केली असता साप तिथे आल्यासं समजलं.

VIDEO | गिरीश महाजन पुन्हा 'संकटमोचक', जळगावात सापाला पकडून जीवदान, थरार कॅमेरात कैद
गिरीश महाजन यांचं सापाला जीवदान
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 1:04 PM

जळगाव : भाजपचे ‘संकटमोचक’ अशी ख्याती असलेले दिग्गज नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे सापासाठीही संकटातील तारणहार ठरले. महाजन यांनी जळगावात मोठा साप पकडून त्याला जीवदान दिले. मंगळवारी गिरीश महाजन यांनी तब्बल पाच फूट लांबीचा साप पकडला. हा थरार उपस्थितांनी कॅमेरात कैद केला.

गिरीश महाजन हे जळगावातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. फडणवीस सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. फडणवीस सरकार संकटात असताना महाजन अनेकदा ‘संकटमोचक’ ठरले आहेत. मंगळवारी महाजनांनी हीच भूमिका घेत सापालाही जीवदान दिले.

नेमकं काय घडलं?

गिरीश महाजन आपल्या जळगावातील निवासस्थानी जात होते. त्यावेळी बस स्थानक परिसरात त्यांना गर्दी दिसली. त्यांनी विचारणा केली असता साप तिथे आल्यासं समजलं. त्यावेळी महाजनांनी हिंमत दाखवत स्वतःच सापाला पकडून जीवदान दिलं. महाजनांच्या बहादुरीनंतर जमावानेही त्यांच्या नावाने जयघोष केला.

पाहा व्हिडीओ :

म्हणून गिरीश महाजन लोकप्रिय झाले

गिरीश महाजन हे जामनेरमध्ये प्रसिद्ध होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे त्यांचा लोक संपर्क. कुणाचा अपघात झाला असेल तर धावून जाणे, कुणाच मृत्यू झाला असेल तर आधी त्या ठिकाणी पोहोचणे, जामनेरमध्ये मोटारसायकलवरून फिर, चहाच्या टपरीवर चहा घेता घेता लोकांशी गप्पा मार, कट्ट्यावर बसून तरुणांशी गप्पा मार, जयंती, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, तरुणांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरणे आदी कारणांमुळे ते जामनेरमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत.

संबंधित बातम्या :

Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

खरंच गारुडी सापांना काबूत ठेवू शकतो? सापाचे दात काढण्याची बाब कितपत खरी? जाणून घ्या याबाबत

(BJP leader Girish Mahajan catches live 5 feet snake in Jamner Jalgaon)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.