Girish Mahajan : मविआचं सरकार इतिहासातील सर्वाधिक निष्क्रिय, गेंड्यांच्या कातडीचं म्हणल तर गेंड्यालाही लाज वाटेल : गिरीश महाजन
आज पर्यंतच्या इतिहासात अतिशय निष्क्रिय सरकार असून या गेंड्याच्या कातडीचे म्हटलं तर गेंड्याला ही लाज वाटेल, अशी टीका महाजन यांनी केली आहे. इतकं निर्लज्ज सरकार या राज्यात आलेले असल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
जळगाव: भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA) टीका केलीय. महाविकास आघाडी सरकार म्हणजे संवेदनाहीन सरकार आहे. आज पर्यंतच्या इतिहासातील अतिशय निष्क्रिय सरकार असून या गेंड्याच्या कातडीचे म्हटलं तर गेंड्याला ही लाज वाटेल, अशी टीका महाजन यांनी केली आहे. इतकं निर्लज्ज सरकार या राज्यात आलेले असल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. नागपूरमधील अतिरेक्यांची रेकी आणि पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या प्रकारावरुन गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. यावेळी भाजप खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील रक्तवाहिनी बंद
विद्यार्थी, सामान्य माणसांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील रक्तवाहिनी एसटी बंद पडली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारला काही पडली. विजेचा प्रश्न, नोकर भरतीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, कुणाला काही पडलेले नाही. कोणताही मंत्री आंदोलकांना भेटायला जात नाही. राज्यातील सर्व घटक हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
अतिरकेी संघटनांचे धाबे दणाणल्यानं नागपूरमध्ये रेकी
नागपूर येथील आरएसएसच्या कार्यलय परिसरात जैश ये मोहमद संघटनेने रेकी केल्याचं समोर आलं आहे. अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असल्यानं त्यातूनच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. कलम 370 नंतर हटवल्यानंतर अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून यातूनच हा प्रकार झाल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबला गेले असताना सुरक्षेचा जो पोरखेळ झाला ती अतिशय गंभीर बाब आहे. देशाचे पंतप्रधान आहेत. ते ज्यावेळी एखाद्या राज्यात जातात ते देशाचे असतात. काँग्रेस नेत्यांनी बोलायला काही ठेवलेलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
इतर बातम्या:
BJP leader Girish Mahajan slam MVA Government and Congress over various issue