नवाब मलिकांनी शोधलेल्या वनस्पतीचं बियाणं शेतकऱ्यांना द्या, राधाकृष्ण विखे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आर्यन खान प्रकरण, दूध संघांतर्फे शेतकऱ्यांना देण्यात येणार अनुदानावरुन बाळासाहेब थोरात आणि हर्बल तंबाखूवरुन नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

नवाब मलिकांनी शोधलेल्या वनस्पतीचं बियाणं शेतकऱ्यांना द्या, राधाकृष्ण विखे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवाब मलिक राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 12:52 PM

अहमदनगर: भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आर्यन खान प्रकरण, दूध संघांतर्फे शेतकऱ्यांना देण्यात येणार अनुदानावरुन नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. हिवाळी अधिवेशनात कोणत्या दुध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे सुतोवाच विखे पाटलांनी केलेय.

नवाब मलिकांनी शोधलेली वनस्पती शेतकऱ्यांना द्या

नवाब मलिकांनी जी नवीन वनस्पती शोधलीय ती वनस्पती शेतक-यांना पुरवण्याचे कृषी खात्याला आदेश द्यावेत. शेतक-यांना त्या वनस्पतीचे बी मिळाले तर त्यांचा लाखो रुपयांचा फायदा होईल, असे पत्र मुख्यमंत्र्याना पाठवल्याची माहीती भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय.

देशात शाहरुख खानच्या पोराचा विषय शिल्लक राहिलाय का?

शाहरुख खानचा पोरगा गांजा पितो की काय करतो ? समीर वानखेडे बिचारा काय करत होता हे गेले 25 दिवस सुरू होते.देशात आता इतर प्रश्नच शिल्लक नाहीत का असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केलाय. राहुरी तालुक्यातील दूध संस्थेच्या रिबीट वाटपप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलय.

दूध संघांनी किती पैसे लाटले याचा भांडा फोड करणार

मागील सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले होते.मात्र, शेतक-यांना अनुदान न देता ते दूध संघाने ते पैसे हडप केलेत. कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे सुतोवाच विखे पाटलांनी केलेय.

दिपावलीत अनेक दुध संस्था शेतक-यांना रिबीट वाटप करत आहे. या मुद्द्याचा आधार घेत विखे पाटलांनी थोरातांचे नाव न घेता निशाना साधलाय. संगमनेर मधील एका सहकारी दूध संघाने वर्षभर दुधाचे पैसे कापले अन तेच पैसे रिबीट म्हणून देण्यात आल्याचे सांगताना शेतक-यांचेच पैसे शेतक-यांना दिले.ते शेतकरी आता आंदोलन करणार असल्याचे विखे पाटलांनी सांगितले.

इतर बातम्या:

सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली, केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य, विनायक राऊतांचं नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीकास्त्र

शेतकऱ्यांना दिलासा; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 नव्हे फक्त 3 दिवस बंद

BJP leader Radhakirshna Vikhe Patil said Maharashtra Government should gave permission to farmer germinate Herbal Tobacco which invented by Nawab Malik

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.