“आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा ‘त्या’ शेंबड्याचे नाव घेऊ नका”; नामाकरणावरून विरोधकांना भाजप आमदाराने उडवून लावलं

माझे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना त्याबाबत सूचना केल्या आणि त्यानंतर गिरीश महाजन यांचा मला लगेच फोन आला आणि आपली त्यांनी मागणी मान्य केली.

आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा 'त्या' शेंबड्याचे नाव घेऊ नका; नामाकरणावरून विरोधकांना भाजप आमदाराने उडवून लावलं
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 8:59 PM

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून औरंगाबाद आणि आता अहमदनगर शहरांचे नामाकरण करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आज अहमदनगरचे नामाकरण अहिल्यादेवीनगर केल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनतेच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.तर त्यांनी त्याचवेळी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. अहमदनगरचे नामाकरण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी बोचरी टीका आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिवशीच अहमदनगरचे नामाकरण केल्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे, त्यामुळे त्या शेंबड्याचे नाव घेऊ नका असे म्हणत त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, आजचा हा दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाची घटना आहे. त्याच बरोबर आमच्या आईसाहेब अहिल्यादेवी यांचे नाव देण्यात येत आहे त्यामुळे ही आमच्यासाठी अभिमानाची घटना असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आजच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत जलदगतीने या नावाची त्यांनी घोषणा केली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, आज अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे.

त्यांनी ही मागणी मान्य केल्यामुळेच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने मी त्यांचे विशेष अभिनंदन करत असल्याचे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

यावेळी ते म्हणाले की, दुसरे अभिनंदन यासाठी करतो की, बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची लाईव्ह मागणी केली होती.

त्यामुळे माझे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना त्याबाबत सूचना केल्या आणि त्यानंतर गिरीश महाजन यांचा मला लगेच फोन आला आणि आपली त्यांनी मागणी मान्य केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी त्या शेंबड्याचे नावही आज घेऊ नका असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.