“दिवा विझायच्या अगोदर फडफडतो, तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची”; ठाकरेंवर कुणी केला घणाघात…

राजकारणात आता त्यांना शरद पवार हा शेवटचा पर्याय वाटतो आहे. पवार साहेबांची भांडी घासल्याशिवाय त्यांना राजकीय जीवदान मिळणार नाही हे त्यांना चांगलं माहिती असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

दिवा विझायच्या अगोदर फडफडतो, तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची; ठाकरेंवर कुणी केला घणाघात...
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 4:46 PM

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे त्यांनी बंडखोरी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला. त्यावरून आता राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाा साधला होता. आदित्य ठाकरे यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर आता भाजपनेही त्यांच्या या आरोपांवरून ठाकरे कुटुंबाला त्यांनी लक्ष्य केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी टीका केली असली तरी या वादात आता उद्धव ठाकरे यांना ओढून माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना आता कुणाचा ना कुणाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काहीच राहिले नाही त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांकडून असे आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पक्ष राहिलेला नाही, त्याच बरोबर ते आता एका मित्रमंडळाचे फक्त अध्यक्ष राहिलेले आहेत.

त्याचबरोबर तेही लावारीस गटाचे प्रमुख राहिले आहेत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता हे राजकारण आणखी तापणा असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांना आता शरद पवारांकडे जाणे त्यांना भागच आहे. सध्या त्यांची अवस्था म्हणजे दिवा विझायच्या अगोदर फडफडतो ना, तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे.

राजकारणात आता त्यांना शरद पवार हा शेवटचा पर्याय वाटतो आहे. पवार साहेबांची भांडी घासल्याशिवाय त्यांना राजकीय जीवदान मिळणार नाही हे त्यांना चांगलं माहिती असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

त्यामुळे आता कितीही प्रयत्न केला तरी त्यांना जास्त यश मिळणार नाही. उद्धव ठाकरे कसे आहेत हे महाराष्ट्राला आता कळले असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना कुठल्याच गोष्टीत यश मिळणार नाही असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे वाद टोकाला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.