कुठल्या बिळात लपलाय, वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या; समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना ललकारले
40 कोटी रुपये खाऊन का बसलाय? तुमचीच भाषा ना. मी बिळातून बाहेर आलोय. आता तुम्ही कुठल्या बिळात जाऊन बसलाय? मला सांगा. त्या बिळातून बाहेर पडायला काय करू सांगा? कुठं गेलं तुमचं वाघाचं काळीज?
कोल्हापूर : भाजपचे आमदार समरजित घाटगे आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यातून विस्तवही जाताना दिसत नाहीये. समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा मुश्रीफ यांना डिवचलं आहे. कुठल्या बिळात लपलाय. वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या, असं आव्हानच समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांना दिलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आता घाटगे यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, घटगे आणि मुश्रीफ वादाने कोल्हापूरचं राजकारण चांगलच तापलं आहे.
समरजित घाटगे यांच्या हस्ते कागल तालुक्यातील सावर्डे येथे पाणी योजनेचं उद्घाटन करण्यात आल. यावेळी सभा पार पडली. त्यावेळी घाटगे यांनी मुश्रीफ यांना हा सवाल केला. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअर्ससाठी घेतलेले 40 कोटी गेले कुठे?, असा खरमरीत सवालही समरजित घाटगे यांनी केला. समरजित घाटगे यांच्या आव्हानामुळे घाटगे – मुश्रीफ वाद वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचा अर्थ तुम्ही पैसे खाल्ले का?
40 कोटी रुपये साधे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या बँकेतही डिपॉझिट झाले नाहीत. काय म्हटलं मी. 40 कोटी रुपये गोळा झाले का कॅशमध्ये? की चेकमध्ये ना? सरसेनापती घोरपडेंच्या अकाऊंटमध्येही डिपॉझिट नसेल. तेवढी एन्ट्री तरी दाखवा. लोकांचे पैसे घेतले. पावती दिली ना. मग पावती दिल्यावर ते पैसे कुठे तरी खात्यात दिसले पाहिजे ना. खात्यातही वर्ग नाही. झालं. म्हणून विचारतोय मुश्रीफ साहेब अशा कोणत्या बिळात जाऊन बसला आहात? त्यातून तुम्ही बाहेरच पडत नाही?
40 कोटी रुपये खाऊन का बसलाय? तुमचीच भाषा ना. मी बिळातून बाहेर आलोय. आता तुम्ही कुठल्या बिळात जाऊन बसलाय? मला सांगा. त्या बिळातून बाहेर पडायला काय करू सांगा? कुठं गेलं तुमचं वाघाचं काळीज? वाघाचं काळीज गेलं का? मी मुश्रीफ साहेबांना विचारतो. या 40 वर्षाच्या मुलाला ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूकही लढली नाही, त्याला उत्तर द्या. आहे का धाडस तुमच्यात? नाही ना. आज तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत नाही. याचा अर्थ तुम्ही 40 कोटी रुपये खाल्ले का? असा अर्थ काढायचा का? असा सवाल त्यांनी केला.
मानहानीचा दावा दाखल करणार
40 हजार शेतकऱ्यांची सर्वसाधारण सभा कधी घेतला याचा पुरावा दाखवा. मुश्रीफ साहेब us अमित शाह नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील भेटतील. जी 20 परिषदेमध्ये जाऊन कारखान्यासाठी कर्ज देखील मागतील, असा खोचक टोला त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून लगावला होता. कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे जनता ठरवेल. शाहू दूध संघावरून केलेले आरोप सिद्ध करा. अन्यथा 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करेन, असा इशाराही त्यांनी दिला होता.