सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

| Updated on: Apr 24, 2021 | 5:33 PM

सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये
Sujay Vikhe Patil
Follow us on

अहमदनगर : कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी आयडिया लढवली. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. 300 इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली. (BJP MP Sujay Vikhe Patil brings Remdesivir injections by private plane from Delhi to Ahmednagar Maharashtra )

दोन दिवसापूर्वी सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. त्यानंतर त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले.

माझ्यापरीने जमेल ते करतोय

माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले.

माझ्या मनात पाप नाही

मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखेंनी सांगितलं.

सुजय विखे पाटील यांची फेसबुक पोस्ट

संबंधित बातम्या

Remdesivir Price List: कोरोनावरील ‘रामबाण’ उपाय! बाजारात ‘या’ 7 कंपन्यांचं रेमडेसिविर उपलब्ध, किंमत किती?   

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा