“संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं”; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले

संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 7:30 PM

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा जोरदार सामना रंगला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होण्यास कारणीभूत खासदार संजय राऊत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतो आहे. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे राज्यात भाजप जर मजबूत व्हायचे असेल तर खासदार संजय राऊत यांनी कायमस्वरुपी भाजपवर त्यांनी टीका केली.

त्यांच्यामुळेच राज्यातील भाजप मजबूत होत आहे असा उपरोधिक टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागले होते. खरं तर त्यांच्यामुळेच राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत सध्या भाजपवर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ टीका करत असतात. त्यामुळे त्यांच्याच टीकेचा फायदा भाजपला होता.

त्यामुळे त्यांनी भविष्यातही भाजपवर टीका करत राहावी, त्यामुळे त्याचा फायदाच आम्हाला होणार आहे असं मतही सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करत असतात, मात्र त्यांनी टीका केल्यामुळे पक्षाला त्याचा तोटा होत नाही तर त्याचा फायदाच भाजपला होत आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.