नांदेड : राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता पुन्हा एकदा भाजपने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसवल्यानंतर त्यांना त्यांची निवड चुकली असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून सध्या भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असली तरी पूर्वी सामना वृत्तपत्रातून भाजपचे कौतूक केले जात होते.
त्याचबरोबर गुजरातच्या राजकारणाविषयीही सामनातून कौतूक केले जात होते असा मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
आता ज्याप्रमाणे टीका केली जात आहे, ती भाजपवर टीका केली जात असली तरी ती टीका खोट्या पद्धतीन केली जात असल्याचे सांगत त्यांनी सामनावर जोरदार प्रहार केला आहे.
सामना वृत्तापत्रातून आता भाजपवर टीका केली जाते मात्र ती टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सांगण्याप्रमाणे टीका केली जाते आहे.
त्यामुळे सामना पेपरातून झालेली टीका ही चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचे सांगत मुळात ते लिखाणच खोट्या पद्धतीने केले जात असल्याचे त्यांनी विश्वासनेही सांगितले आहे.
सामनातून सध्या खोटे लिखाण केले जात असले तरी यापूर्वी आता गुजरातचे मॉडेल चांगलं अशा प्रकारची स्तुतीसुमनं त्यावेळी करण्यात आली होती.
त्यामुळे आता ज्या प्रमाणे भाजपवर टीका केली जात आहे. ती टीका ही काँग्रेस-राष्ट्रवादी सांगते तसं सामना वृत्तपत्रातून लिहिले जाते असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर वारंवार टीका केली जात असते. त्याच प्रमाणे संजय राऊत यांच्याकडून राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात असतो. त्यामुळे राऊत आणि नितेश राणे यांची बरोबरी होऊ शकत नाही. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नितेश राणे उत्तर द्यायला समर्थ आहेत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले असले तरी त्यानंतर त्यांना त्यांची निवड चुकली होती हे त्यांना आता कळून चुकलं आहे असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.