“ठाकरेंची चूक निस्तारण्याच्या पलिकडे गेलेय”; ठाकरे गटाची टीका, त्यात भाजपही उडी

महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानीचे बाजू् घेतात. त्यामुळे महाविकास आघाडीची सध्याची काय अवस्था आहे ती दिसून येत आहे असा घणाघातही प्रमोद जठार यांनी केला आहे.

ठाकरेंची चूक निस्तारण्याच्या पलिकडे गेलेय; ठाकरे गटाची टीका, त्यात भाजपही उडी
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 5:58 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून बंडखोरी केली आहे. मात्र आता ठाकरे गटाकडे टीका करण्यासाठी दुसरा कोणताही विषय नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आरोप केले जात असल्याची टीका भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, ठाकरे गटाची शिवसेना आता डूबतं जहाज आहे. त्यामुळे सोडून चाललेल्या आमदार आणि खासदारांमुळे ठाकरे गटाची घालमेल होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रमोद जठार यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं अशी अवस्था ठाकरे गटाची झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या नेत्यांवर वाटेल ते आरोप केले जात आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर युती करून चूक केली आहे. त्यामुळे ती चूक निस्तारायची वेळ ठाकरे गटावर आली आहे. त्याच चुकीचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडले जात आहे.

त्यातच आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचेही दिसून येत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसून येत नाही तर अजित पवार वेगळं बोलतात.

तर महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानीचे बाजू् घेतात. त्यामुळे महाविकास आघाडीची सध्याची काय अवस्था आहे ती दिसून येत आहे असा घणाघातही प्रमोद जठार यांनी केला आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....