“त्यांच्या विजयात भाजपचा वाटा लपून राहू शकत नाही;” सुजय विखे यांनी स्पष्टचं सांगितलं
नाना पटोले आत्ताच श्रीनगरमधून आले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त थंडी वाजली आहे. त्यामुळे ते असं बोलू शकतात. त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका, अशी टीका त्यांनी केली.
अहमदनगर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा असल्याची दखल ते घेत नसतील. अथवा न घेण्याने त्यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पार्टीचे योगदान हे लपून राहू शकत नाही, असं सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी म्हटलंय. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी एका मुखाने सत्यजित तांबे यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली होती. शेवटच्या दिवशी झालेल्या घडामोडी या जनतेपासून लपून राहिलेल्या नसल्याचं त्यांनी म्हटलंय. माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचा जे आव्हान दिलं आहे. त्यावर सुजय विखे यांनी समाचार घेतलाय.
आव्हान देणाऱ्यांच्या पिताश्रींनी असा आव्हान केलं होतं की, मी विधान परिषदेचा राजीनामा देईल. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, असं आव्हान सुजय विखे यांनी दिलाय. तसेच ते पक्षश्रेष्ठी आहेत जे महाराष्ट्र राज्याचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहिले. जे म्हणतात माझा शब्द अंतिम आहे, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्या पक्षाच्या कोणत्याही इतर लोकांना बोलण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी म्हंटलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आता मौन सोडणे गरजेचे आहे असले तर सुजय विखे यांनी म्हटले आहे.
थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी
अहमदनगर जिल्ह्यात उरलेली जी काँग्रेस आहे त्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडावे, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलंय. मामा भाचे ही केस ही महाभारतापासून आलेली आहे. कोण मामा कोण भाचा हे त्यांच्या घरातील अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर त्यांनी मौन का सोडावे काय बोलावे हे आमच्यापेक्षा जिल्ह्यातील उरलेल्या काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांसाठी बोलणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलय. ज्या माणसाला पक्षाने साडेसात वर्षे महसूल मंत्री पद दिलं त्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं मत त्यांनी व्यक्त केलाय.
नाना पटोले यांना थंडी लागली
खासदार सुजय विखे यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. नाना पटोले आत्ताच श्रीनगरमधून आले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त थंडी वाजली आहे. त्यामुळे ते असं बोलू शकतात. त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका, अशी टीका त्यांनी केली. आमच्या पक्षांत आमचं कार्य त्यांना पाहवलं जात नाही. आधी त्यांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं, असा टोला देखील सुजय विखे यांनी लगावला आहे.