चंद्रपूर : काँग्रेसच्या आझादी का गौरव यात्रेत (Azadi Ka Amrit Mahotsav) खासदार बाळू धानोरकर यांनी आक्षेपार्ह भाषण केलं. ब्राम्हण समाजाला भर सभेत शिवीगाळ केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील ‘क्लिन चिट’वरून टोलेबाजी केली. ‘ब्राम्हणांची पोरं बदाम-खारका खातात आणि बहुजनांची (Bahujan) जांभया देतात’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भाषणात लगेच पलटी मारत अशी काही काही लोकं असतात, अशी सारवासारव केली. महाराष्ट्रातील काँग्रेसचे लोकसभेतील ( Lok Sabha) बाळू धानोरकर हे एकमेव खासदार आहेत. शिवसेनेतून काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. या आधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून वाद ओढविला आहे. अशा वक्तव्यामुळं समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अशी वादग्रस्त वक्तव्य टाळली पाहिजे, असं मत व्यक्त केलं जातंय. हिंदू समाजात कोणताही एक समाज हा पूर्णपणे विकसित किंवा गरीब नाही. असे मतभेद करणं योग्य नसल्याचं आनंद दवे म्हणालेत.
यासंदर्भात हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले, कुणाचंही खाण-पिणं काढणं हे निव्वड मुर्खपणाचं लक्षण आहे. त्यामुळं बाळू धानोरकरांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. हिंदू धर्मात क्लेष उत्पन्न करून त्यांना काय मिळतं, हेच मला कळतं नाही. एका विशिष्ट समाजातली सर्व मुलं काजू-बदाम खातात आणि दुसऱ्या समाजातील सर्व मुलं जांभया देतात, असं कुठंही नाही. काँग्रेसच्या कार्यक्रमात बाळू धानोरकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. ब्राम्हणांची मुलं खारका-बदामा खातात. बहुजनांची मुलं जांभया देतात. फडणवीसांबद्दल बोलताना बाळू धानोरकर यांचा तोल सुटला. किती नालायक लोकं आहेत. आपण अनुभवलं ना, असंही धानोरकर म्हणाले.
स्वतःच्या प्रगतीसाठी एखादा समाज मागे राहत असेल, तर दुसऱ्या समाजाला शिव्या देऊन काही उपयोग नाही. प्रत्येकानं स्वतःची प्रगती केली पाहिजे. बाळू धानोरकर यांच्या वक्तव्याचा काँग्रेसनं निषेध करावा. धानोरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी असल्याचं आनंद दवे म्हणाले. काँग्रेस पक्षानं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं करणार असल्याचं ते म्हणाले.