बुलडाणा: एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. संपावर तोडगा निघत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोतील एका एसटी कर्मचाऱ्यानं नैराश्यातून विष प्राशन केलं होतं. विशाल अंबलकर या एसटी कर्मचाऱ्याचं अकोला येथे उपचारादरम्यान निधन झालं आहे. तर, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.
दोन दिवसांपूर्वी विष प्राशन
राज्यात एसटी कर्मचार्यांच्या संप सुरु असून राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप पर्यंत कुठलाही तोडगा या संपाबाबत निघालेला नाही. आता कर्मचारी आत्महत्येच्या दिशेने वळत असल्याचे दिसून येत आहे. एसटी विभागाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे धोरण अवलंबत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी खामगाव एसटी आगारामध्ये सहाय्य्क मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबलकर या कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
एसटी संप चिघळण्याची शक्यता
विशाल अंबलकर यांच्यावर अकोला येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना रात्री प्राणज्योत मालवली. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्याची पहिली आत्महत्या ठरली आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यातील आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 200 च्या जवळपास कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून कारवाईचे सत्र सुरू असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी असलेले खामगाव एसटी आगारातील सहाय्यक मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबलकर यया कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आपल्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, त्यांना सुरुवातीला खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर अकोला येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनलेली होती. काल रात्री नऊच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विशाल अंबलकर यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य शासन यासंदर्भात कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे परिवारातील सदस्यांना सांगितले होते. जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अंबलकर यांच्या निधनामुळं संतप्त झाले आहेत. आज सकाळी अंबलकर यांचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आलाय. राज्यभरात आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या 40 वर गेली आहे. मात्र, तोडगा निघत नसल्यानं एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.
इतर बातम्या:
Azad Maidan ST Strike | आझाद मैदानावर संपकरी आक्रमक, कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Buldana ST Worker Vishal Ambalkar died at Akola he taken poison