बुलडाण्यात गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा रिटर्न, 54 हजारांची चिल्लर घेऊन व्यापारी पालिकेत, कर्मचारी अचंबित

सिनेमाचा सामान्य माणसांच्या जीवनावर किती परिणाम होत असतो याची अनेक उदाहारण आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटातील अनेक प्रसंग सामान्य जीवनात आपल्याला पाहयाला मिळतात.

बुलडाण्यात गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा रिटर्न, 54 हजारांची चिल्लर घेऊन व्यापारी पालिकेत, कर्मचारी अचंबित
व्यापाऱ्यानं आणली 54 हजारांची चिल्लरImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 6:28 PM

बुलडाणा : सिनेमाचा सामान्य माणसांच्या जीवनावर किती परिणाम होत असतो याची अनेक उदाहारण आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटातील अनेक प्रसंग सामान्य जीवनात आपल्याला पाहयाला मिळतात. काही वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ग्रामीण भागातील राजकारणावर तो सिनेमा भाष्य करणारा ठरला होता. त्या सिनेमात मकरंद अनासपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना नाणी भरली होती. त्या सिनेमानंतर अनेक ठिकाणी रक्कम जमा करताना नाणी जमा करण्याची स्टाईल आली होती. आता, बुलडाण्यात (Buldana) देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. पालिकेचा कर भरण्यासाठी (Tax Payment ) नागरिकाने आणली 54 हजाराची चिल्लर जमा करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांना “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” सिनेमातील घटनेची आठवण झाली.

खामगाव नगर पालिकेतील प्रकार

काही वर्षांपूर्वी “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता, या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे निवडणुकीची अनामत रक्कम भरण्यासाठी नाणी घेऊन येतात. तसाच एक प्रकार खामगाव नगर पालिकेत समोर आलाय. मार्च अखेर असल्याने नगर पालिकेकडून कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खामगाव शहरातील एक व्यापारी कर भरण्यासाठी पालिकेत आला, मात्र त्याने चार कॅरेट मधून तब्बल 54 हजार रुपयांची 1 , 2 आणि 5 रुपयांची नाणी आणली. ही चिल्लर मोजतांना पालिका कर्मचारी मात्र चांगलेच घामाघूम झालीय.

नाणी कोणी घेईना, म्हणून कर भण्यासाठी वापरली

खामगाव येथील जगदीश कल्याणदास बोहरा यांच्याकडे पालिकेचा 93 हजार 833 रुपये मालमत्ता कर बाकी होता. तो कर भरण्यासाठी बोहरा 1, 2 आणि 5 रुपयांची नाणी अशी 54 रुपयांची चिल्लर नाणी घेऊन नगरपालिकेत पोहोचले. एवढी चिल्लर पाहून कर्मचारी सुद्धा अचंबित झाले आणि हे केव्हा मोजायचे असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त 20 हजार रुपयांची नाणी स्वीकारली , तर बाकी रक्कम टप्या टप्प्याने भरण्याचे सुचविले. मात्र या घटनेवरून एका मराठी चित्रपटाची आठवण उपस्थितांना झाली. तर ही चिल्लर आम्हा व्यावसायिकांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कारण बॅंकसुद्धा चिल्लर नाणी स्वीकारत नाही. त्यामुळे यावर काय इलाज करावा, असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला असल्याचे मत या व्यावसायिकाने व्यक्त केलेय.

इतर बातम्या:

VIDEO | महाराष्ट्रात बदल्यांचा महाघोटाळा; रसद केंद्रीय गृहसचिवांना दिली, फडणवीसांचा धमाका!

मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.