अधिकाऱ्याच्या चुकीच्या माहितीचा फटका, बुलडाणा जिल्हा थेट तिसऱ्या टप्प्यात, अनलॉक अंतर्गत येणार अनेक निर्बंध

अधिकाऱ्याने चुकीची माहिती दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. (buldhana corona wrong information unlock)

अधिकाऱ्याच्या चुकीच्या माहितीचा फटका, बुलडाणा जिल्हा थेट तिसऱ्या टप्प्यात, अनलॉक अंतर्गत येणार अनेक निर्बंध
BULDANA UNLOCK
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 11:31 PM

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर येत्या 7 जूनपासून राज्यात 5 टप्प्यात अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात येणार आहे. मात्र, अधिकाऱ्याने चुकीची माहिती दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. चुकीच्या माहितीमुळे हा जिल्हा अनलॉकच्या थेट तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असून त्यामुळे येथील दुकाने, आस्थापनांवर तसेच इतर बाबींवर अनेक निर्बंध येणार आहेत. पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश नसणार आहे. मात्र, लवकरच ही त्रुटी दूर करुन खरी माहिती राज्याच्या पोर्टलमध्ये अपडेट केली जाईल. तशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. (Uldhana district Corona wrong information updated on portal under unlock it falls in third stage)

नेमका घोळ काय झाला ?

राज्यात उद्यापासून अनलॉक सुरु होत आहे. एकूण 5 टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्याचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये सगळं काही सुरु होणार आहे. याच टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याचासुद्धा समावेश होता. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पोर्टलमध्ये पोस्ट केली. परिणामी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट वाढलेला दाखवण्यात आला. याच कारणामुळे हा जिल्हा अनलॉकच्या थेट तिसऱ्या टप्प्यात गणला जात आहे. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तशी माहिती दिली आहे.

लवकरच खरी माहिती पोर्टलवर अपडेट करु : राजेंद्र शिंगणे

हा प्रकार समोर आल्यानंतर त्यावर शिंगणे यांनी अधिकचे स्पष्टीकरणसद्धा दिले आहे. त्यांनी अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे घडले असून लवकरच खरी माहिती राज्याच्या पोर्टलमध्ये पोस्ट केली जाणार असल्याचे सांगितले. ही चूक दुरुस्त केल्यानंतर बुलडाणा जिल्हा लवकरच अनलॉक होण्याची शक्यता आहे. तशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केली.

पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

दरम्यान, राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेला प्रत्यक्षपणे 7 जूनपासून सुरुवात होईल. पॉझिटिव्हीटी रेट आणि रुग्णांनी ऑक्सिजन बेड्स व्यापण्याचे प्रमाण यावर अनलॉकसाठी वेगवेगळे निकष ठरवण्यात आले आहेत. याच निकषांवरच निर्बंध शिथील केले जात आहेत.

इतर बातम्या :

चुकलो असेल तर दिलगीर आहे, पण दिशाभूल करणं रक्तात नाही; संभाजी छत्रपती रायगडावरून गरजले

आधी सरकारने भूमिका जाहीर करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू: उदयनराजे भोसले

कोरोनाची तिसरी लाट आली तर उद्योग थांबता कामा नये: उद्धव ठाकरे

(Uldhana district Corona wrong information updated on portal under unlock it falls in third stage)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.