Video | बंदी असताना अहमदनगरात बैलगाडा शर्यतीचा थरार, कोरोना नियमांचे उल्लंघन

बंदी असतानादेखील अहमदनगर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचे पाहायला मिळाले. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.

Video | बंदी असताना अहमदनगरात बैलगाडा शर्यतीचा थरार, कोरोना नियमांचे उल्लंघन
ahmednagar
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 6:08 PM

अहमदनगर : बंदी असतानादेखील अहमदनगर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचे पाहायला मिळाले. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पठार भागात या शर्यतीचे आयोजन करण्यात आला आहे. या थरारक शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (bullock cart race was organised in ahmednagar sangamner corona rules violated)

संगमनेर तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन

बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास राज्यात बंदी आहे. नियम धुडकाऊन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेच तर त्यासाठी कठोर कारवाईची तरतूद आहे. असे असूनदेखील राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. अहनमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातसुद्धा अशाच प्रकारे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. तालुक्यातील पठार भागात ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीदरम्यान येथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच येथे लोकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.

गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केली बैलगाडा शर्यत

दरम्यान बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी अनेक संघटना तसेच राजकीय पक्ष करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी घातली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.

बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निलेश लंकेंच्या मंत्र्यांना भेटीगाठी

बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरु करण्याची मागणी घेऊन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेसुद्धा (Nilesh Lanke) मैदानात उतरले आहेत. त्यांनी 12 ऑगस्ट रोजी पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून यासंदर्भातील निवेदन दिलं होतं. राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तत्काळ घेण्यात यावी, अशी मागणी लंके यांनी केली होती

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.90 लाख रुपयांत, 1 लीटर पेट्रोलमध्ये 22 किलोमीटरचं मायलेज

ओबीसी आरक्षणासाठी नांदेड आणि हिंगोलीत खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन

‘ताकद पहायची असेल तर उजनी धरण ओलांडून दाखवा’, माजी मंत्री तानाजी सावंतांचा दत्तात्रय भरणेंना सज्जड दम!

(bullock cart race was organised in ahmednagar sangamner corona rules violated)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.