Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी चोरी; सोन्याच्या दागिन्यांसह रिव्हॉल्वर चोरले

गावचा आठवडे बाजार असल्याने जालिंदर सातपुते हे गावात बाजार घेण्यासाठी गेले होते. तर सातपुते यांच्या घरातील महिला शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे सातपुते यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी हीच संधी साधत घराचा दरवाजा आणि कुलूप कटावणीने तोडून घरात घुसखोरी केली.

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी चोरी; सोन्याच्या दागिन्यांसह रिव्हॉल्वर चोरले
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:18 PM

अहमदनगर : घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एका माजी सैनिका (Ex Army Man)च्या घरी धाडसी चोरी केल्याची घटना अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी वांगदरी येथे घडली आहे. जालिंदर रामदास पाचपुते असे लुटण्यात आलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. चोरट्यांनी घरातील 15 तोळे सोने (Gold Jewelery) आणि सातपुते यांची रिव्हॉल्वर चोरुन नेले आहे. सातपुते घरी आल्यानंतर चोरीची घटना उघड झाले. त्यानंतर सातपुते यांनी याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. (Burglary at ex-serviceman’s house in Ahmednagar, Stolen revolver with gold jewelry)

घराचा दरवाजा आणि कुलूप तोडून चोरटे घरात घुसले

गावचा आठवडे बाजार असल्याने जालिंदर सातपुते हे गावात बाजार घेण्यासाठी गेले होते. तर सातपुते यांच्या घरातील महिला शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे सातपुते यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी हीच संधी साधत घराचा दरवाजा आणि कुलूप कटावणीने तोडून घरात घुसखोरी केली. यानंतर घरातील कपाटातून सुमारे 15 तोळे सोने आणि सातपुते यांनी निवृत्तीनंतर स्वरक्षणासाठी घेतलेली रिव्हॉल्वर चोरुन पोबारा केला. सातपुते बाजारातून घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी

नागपूरमधील सीताबर्डी परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपीची माहिती मिळताच पोलिसही चक्रावून गेले. एक उच्चशिक्षित तरुणी दुचाकी चोरी करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या तरुणीने आतापर्यंत तीन दुचाकींची चोरी केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यात तरुणीसोबत आणखी कुणी सहभागी आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र सुशिक्षित असूनही ही तरुणी हे काम का करीत होती हे अद्याप कळू शकले नाही. (Burglary at ex-serviceman’s house in Ahmednagar, Stolen revolver with gold jewelry)

इतर बातम्या

Nagpur Crime : नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी, अशी फसली पोलिसांच्या जाळ्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादवांसह इतर 37 जणांच्या शिक्षेचा उद्या फैसला

'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.